मुक्तपीठ टीम
गुरुवारी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित ७ ठिकाणी एकाचवेळी ईडीने छापा टाकला. जवळपास १६ तास म्हणजे सकाळपासून सुरू झालेली चौकशी रात्रीपर्यंत सुरू होती. मनी लाँड्रिगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी बोलताना अनिल परब यांनी दापोलीतील साई रेसॉर्ट प्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं. हे रिसॉर्ट अजूनही सुरू झालेलं नाही. पर्यावरणाची २ कलमं लावून त्यातून सांडपाणी समुद्रात जातं अशी तक्रार पर्यावरण मंत्रालयानं दिली, असे अनिल परब म्हणाले.
काय म्हणाले अनिल परब?
- “दापोलीतील साई रेसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत.
- त्यांनी कोर्टात तसं सांगितलं आहे.
- त्यांनी त्याचा हिशेब दिलेला आहे.
- हे रिसॉर्ट अजूनही सुरू झालेलं नाही.
- पर्यावरणाची २ कलमं लावून त्यातून सांडपाणी समुद्रात जातं अशी तक्रार पर्यावरण मंत्रालयानं दिली.
- त्यावरून आज ईडीच्या लोकांनी ही छापेमारी केली.
- त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत.
- याआधीसुद्धा उत्तरं दिली आहेत.
- आजदेखील दिली आहे. त्यापुढेसुद्धा देईन.
- या सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात होईल.
- ६ कोटी रूपयांच्या बातम्या खोट्या आहेत.
- आयकर विभागाचा रिपोर्ट अजून आलेला नाही.
- यात मनी लाँडरिंग झालेलं नाही.
अनिल परबांवरील आरोप-
- विभास साठे यांच्याकडून अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्याला लागून असलेली जागा खरेदी केली होती.
- काही दिवसांनी परब यांनी ही जागा खेड येथील त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी विकली.
- त्यावर सदानंद कदम यांनी अलिशान असे साई रिसॉर्ट उभा केले.
- हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचा भंग करण्यात आल्याची तक्रार भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती.
- या तक्रारीनुसार पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मुरूड येथे जाऊन पाहणी केली आणि पर्यावरण मंत्रालयाला अहवाल सदर केला होता.
- त्यानंतर पर्यावरण कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेले हे साई रिसॉर्ट तोडून टाकावे, असे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिले होते आणि दापोली न्यायालयात यासंदर्भात एक खटलाही दाखल केला आहे.