मुक्तपीठ टीम
श्रावण बाळाची गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी ऐकली आहे. श्रावण बाळाचे त्याच्या आई आणि वडिलांबद्दल असलेल्या प्रेमाचे आणि समर्पनाचे उदाहरण लोकं आजही देतात. असाच एक श्रावण बाळ आजच्या युगात आंध्र प्रदेशात आहे. या श्रावण बाळाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात एक मंदिर बांधले आहे. त्याच्या कामगिरीमुळे लोकांनी त्याला मॉडर्न ‘श्रवण कुमार’ असे संबोधले आहे.
आईची मूर्ती बसवण्याचा निर्धार!!
- आपल्या मृत आईच्या स्मरणार्थ हा श्रावण बाळ मंदिर बांधत आहे.
- या व्यक्तीच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.
- २०१९ मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरू झाले.
- मंदिराच्या आतील एका दगडात कोरलेली आपल्या दिवंगत आईची मूर्ती बसवण्याचा निर्धार केला आहे.
- मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी बिहारमधील कामगार आणि शिल्पकारांवर सोपवली आहे.
मंदिर पूर्ण होण्यासाठी लागणार २ वर्षे…
एका कामगाराने सांगितले की “मी इथे चार महिने काम करत आहे. मूर्ती घडवण्याचे काम माझ्याकडे आहे. मला ते २ वर्षात पूर्ण करण्यास सांगितले आहे. आमची टीम यावर मेहनत घेत आहे. असे होऊ शकते की ते पूर्ण होण्यासाठी २ वर्षांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. तथापि, आम्ही ते अंतिम मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
श्रावण बाळाच्या कथेचे ठेवले आदर्श…
- श्रवण कुमारची कथा खूप प्रसिद्ध आहे.
- श्रवण कुमार आपल्या आई-वडिलांची खूप सेवा करायचा.
- कवडीत बसवून आई – वडिलांना तीर्थयात्रेला निघाला.
- यामुळेच आजही श्रवणकुमार यांच्याशी मुलांची तुलना केली जाते.
- श्रवण कुमार जशी सेवा करत असे तसेच त्यांच्या मुलानेही त्यांची सेवा करावी आणि त्यांचा आदर करावा हीच आई-वडिलांची इच्छा असते.
श्रवण कुमार म्हणाला, ‘मी माझ्या आईवर खूप प्रेम करायचो पण काही वर्षांपूर्वी तिला गमावले. तिचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. मला तिच्या स्मरणार्थ मंदिर बांधायचे आहे आणि त्यासाठी बिहारमधून कामगार बोलावले आहेत. २०१९ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे. माझ्या आईची मूर्ती ६ फूट असेल जी एकाच दगडाची असेल.