मुक्तपीठ टीम
बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांना महानायक मानले जाते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. एकेकाळी केवळ ५०० रुपये पगारावर काम करणारे अमिताभ आज एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतात. आपल्या कामाच्या जोरावर अमिताभ बच्चन सन्मान आणि प्रसिद्धीसह लक्झरी जीवनशैली जगतात. आज अमिताभ कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.
बिग बींची एकूण संपत्ती किती आहे?
- अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती ४१० दशलक्ष डॉलर आहे.
- भारतीय रुपयात ही रक्कम जवळपास ३ हजार ३९६ कोटी रुपये आहे.
- अमिताभ यांची वार्षिक कमाई ६० कोटी रुपये आहे. महिन्याला ते ५ कोटींहून अधिक कमवतात.
अमिताभ बच्चन यांच्या कमाईचे स्रोत कोणते?
- अमिताभ बच्चन यांच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर ते प्रामुख्याने चित्रपटांमधून कमाई करतात.
- यासोबतच बिग बी ब्रँड एंडोर्समेंटद्वारेही मोठी कमाई करतात. . अमिताभ बच्चन एका चित्रपटासाठी सुमारे ६ कोटी रुपये घेतात, तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी ५ कोटी रुपये घेतात.
- अमिताभ यांनी रिअल इस्टेट व्यवसायातही गुंतवणूक केली आहे. . जस्ट डायलसह अमेरिका टेक स्टार्टअपमध्येही त्यांची गुंतवणूक आहे.
अमिताभ बच्चन यांची मालमत्ता…
- अमिताभ बच्चन यांचे मुंबईत चार बंगले असून त्यांची नावे जलसा, जनक, प्रतीक्षा, वत्स अशी आहेत.
- मुंबईतील जुहू भागात असलेल्या जलसा बंगल्यात अमिताभ आपल्या कुटुंबासह राहतात.
- त्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
- प्रतीक्षा या त्यांच्या दुसऱ्या बंगल्याची किंमत १६० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
- बिग बींच्या जनक बंगल्यात त्यांचे ऑफिस आहे. यासोबतच उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे त्यांचे वडिलोपार्जित वास्तव्य आहे.
- अमिताभ यांनी त्याचे शैक्षणिक ट्रस्टमध्ये रूपांतर केले आहे. . याशिवाय त्यांच्याकडे देशभरातही अनेक मालमत्ता आहेत.
वाचा:
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!
अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…
अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…
अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…
अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…
महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…
अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!
अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!