Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी कोल्हापूरच्या अंबाबाईचं तेज तसंच…मूर्तीची झीज झाली नाही!

January 21, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
kolhapurchi aambabai

मुक्तपीठ टीम

 

पाच वर्षांपूर्वी केलेल्या रासायनिक संवर्धनाचे कोणतेही दुष्परिणाम कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीवर झालेले नाहीत. या पुरातन मूर्तीची स्थिती चांगली आहे, असा अहवाल औरंगाबाद विभागाच्या पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या तज्ज्ञांच्या पथकाने दिला आहे. या पथकाने मंदिराला भेट दिली तेव्हा मूर्तीच्या पाहणीनंतर सांगितले. २०१५ मध्ये या मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्यात आले होते. त्यानंतर या पथकाने २०१७ मध्येही एकदा या मंदिराला भेट दिली होती.

 

एएसआयचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा म्हणाले, “अंबाबाईची मूर्ती चांगल्या स्थितीत आहे. या मुर्तीला रासायनिक संवर्धनामुळे कोणताही धोका नाही. त्याने मूर्तीची झीजही होणार नाही.”

 

पूर्वी या मूर्तीच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले गेले. कित्येक वर्षांच्या संशोधनानंतर, मूर्तीत आलेल्या भेगा भरण्यासाठी रासायनिक संवर्धन ही पद्धत निवडली गेली.

 

मूर्तीची झीज होण्याचा मुद्दा हा वादग्रस्त ठरला होता आणि याचे संवर्धन पारदर्शक मार्गाने व्हावे अशी मागणी अनेक भाविक करीत होते. फ्लोरोसेंट दिव्यांच्या उष्णतेमुळे झीज होते, असा काही स्थानिक तज्ञांनी दावा केल्यानंतर मंदिर विश्वस्त अधिकाऱ्यांनी फ्लोरोसेंटचे दिवे बदलले आणि एलईडी दिवे लावले. मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी मंदिरातून महाकाली आणि महासरस्वती यांच्या मूर्तीही तपासाव्यात असा आग्रह धरला होता. “दोन्ही मूर्तींची झीज होत असल्याचे दिसू लागले आणि म्हणून लवकरात लवकर संवर्धनाच्या प्रयत्नांची गरज आहे,” असे मिश्रा म्हणाले.

 

मंदिरातील ट्रस्ट अधिकाऱ्यांनी कॉन्क्रीट स्लॅब काढून टाकण्याच्या योजनेसंदर्भात मार्गदर्शन करावे असा आग्रह धरला. मुंबईतील एका कंपनीने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असे म्हटले होते की, स्लॅबमुळे धतू आणि स्पायर यांना धोका आहे.

 

उपअधीक्षकांचे सहायक संचालक विलास वहाणे म्हणाले, “आम्ही स्लॅब कसा काढायचा यासंबंधीचा अहवाल मागवला आहे. अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच आम्ही स्लॅब काढण्यास सुरवात करु, मंदिराची साफसफाई करणे यासारख्या इतर बाबी देखील आहेत,  मंदिरावर कार्बनचा थर बसला आहे, जो टप्प्याटप्प्याने काढण्यात येईल. ”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Ambabai TempleKolhapurKolhapur Municipal Corporationकोल्हापुर
Previous Post

पाणीपुरवठा योजना पुणे मनपाकडे सुपुर्त शासनाचा सकारात्मक पाठिंबा

Next Post

#चांगलीबातमी टचलेस आहेराची भन्नाट कल्पना, लग्नपत्रिकेवरच क्यूआर कोड

Next Post
wedding

#चांगलीबातमी टचलेस आहेराची भन्नाट कल्पना, लग्नपत्रिकेवरच क्यूआर कोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!