Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाणीपुरवठा योजना पुणे मनपाकडे सुपुर्त शासनाचा सकारात्मक पाठिंबा

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली माहिती

January 21, 2021
in सरकारी बातम्या
0
pune mahanagrpalika

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिवणे, कोंढवे, धावडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील सांगितले. यासंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

 

शिवणे, उत्तमनगर कोंढवे-धावडे व न्यू कोपरे ही चार गावे पुणे महानगरपालिकेच्या वारजे गावाच्या हद्दीलगत वसलेली आहेत. यापैकी शिवणे व उत्तमनगर यांचा पुणे महानगर पालिकेत समावेश करण्यात आला आहे. उर्वरित दोन गावांचा आधी पुणे महानगरपालिकेत समावेश करायचा झाल्यास पुणे महानगरपालिकेने ठराव संमत करावा लागेल. त्यानंतर  केल्यास काही अटी व शर्तींच्या आधारे ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुणे महानगर पालिकेकडे हस्तांतरित करण्यात विभागाची काहीच हरकत राहणार नाही असे पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी पुणे महानगरपालिकेने थकबाकीची रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे द्यावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. थकबाकी संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक आठवड्याच्या आत बैठक घेवून त्यातून मार्ग काढावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

शिवणे, कोंढवे धावडे परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी 2012 मध्ये हा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कार्यान्वित केला. परंतु या चारही गावांची लोकसंख्या अनियंत्रित व झपाट्याने वाढल्याने सध्या होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावा अशी महानगरपालिकेची मागणी आहे.

 

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा

 

या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत काम करणाऱ्या 24  कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. हे कर्मचारी काही अटी व शर्तीचे पालन करून महानगरपालिकेकडे देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची हरकत नाही असे पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, नगरसेवक सचिन दोडके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव अभय महाजन यांच्यासह नगरविकास, जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे महानगरपालिका तसेच पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 


Tags: Government SupportpunePune CorporationWater SupplyWater Supply and Sanitation Ministerपाणीपुरवठापुणेपुणे महानगरपालिका कॉर्पोरेशन
Previous Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके कोणते निर्णय झाले? वाचा…

Next Post

#चांगलीबातमी कोल्हापूरच्या अंबाबाईचं तेज तसंच…मूर्तीची झीज झाली नाही!

Next Post
kolhapurchi aambabai

#चांगलीबातमी कोल्हापूरच्या अंबाबाईचं तेज तसंच...मूर्तीची झीज झाली नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!