मुक्तपीठ टीम
“ओटीटी प्लॉटफर्मवर दाखवल्या जाणाऱ्या आश्लिल कन्टेंटवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे”. असे मत अॅमेझॉम प्राईमच्या क्रिएडिव्ह हेड अपर्णा पुरोहित यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करत असताना सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
ओटीटी प्लॉटफॉर्म्सवर जो काही कन्टेंट दाखविला जातो, त्याचे स्क्रीनिंग झाली पाहिजे. काही प्लॉटफॉर्मवर पॉर्नोग्राफिक कन्टेंटही दाखविला जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोशल मीडिया आणि ऑनलाइन स्ट्रीटीमिंग प्लॉटफॉर्म्सना नियंत्रणात ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये हिंदू देवतांचा अवमान केल्याचे आरोप झाले. तसेच पंतप्रधानांसारख्या संवैधानिक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवल्याचा आरोप झाला. याविरोधात उत्तर प्रदेश, लखनऊ, नोएडा आणि शाहजहांपूर या शहरांमध्ये एफआयआर नोंदविण्यात आले होते. दरम्यान लखनऊमध्ये नोंदविलेल्या एफआयआरमध्ये अॅमेझॉनच्या अपर्णा पुरोहित यांचे नाव आहे. त्यामुळे त्यांनी इलाहाबाद उच्चन्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला. या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवार होणार आहे.
जानेवारीत झाली होती ‘तांडव’ रिलीज
सैफ अली खान, मोहम्मद झीशान अयूब आणि डिंपल कपाडिया यांची प्रमुख भूमिका असणारी तांडव वेब सीरीज जानेवारीत अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली होती. तांडब वेब सीरीजमधील अनेक दृश्यांविषयी आक्षेप घेण्यात आला होता. हिंदू देवतांचा आणि पंतप्रधान पदाचा अवमान केला, पोलिसांची चुकीची प्रतिमा रंगवली असे आरोप केले गेले होते.