Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राष्ट्रवादी नवरा, शिवसेना मूक बायको, काँग्रेस जेवणापुरते वराती!” विधानावरून विखेXपवारXपटोले जुंपली!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sujay vikhe patil

मुक्तपीठ टीम

केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको आणि काँग्रेस हे जेवणापुरते वराती असल्याची टीका सुजय विखे यांनी केली होती. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांवी सुजय विखे पाटलांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना कुणाला उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतात, असा टोला अजित पवारांनी सुजय विखे पाटलांना लगावला आहे.विखेंच्या विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “काँग्रेस बाप आहे, बापच राहणार” असे ते म्हणाले.

 

ज्यांना कुणाला उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतात!

  • अजित पवार रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते.
  • यावेळी त्यांनी जिल्हानियोजनाच्या बैठकीला हजेरी लावली.
  • त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
  • यावेळी सुजय विखे पाटील यांच्या टीकेवरील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सुजय विखेंना फटकारलं.
  • ज्यांना उद्योग नाहीत ते टिका टिप्पणी करतात.
  • माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की, असल्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्यापेक्षा उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे मी इथे येऊन पटापट निर्णय घेतले आहेत.
  • त्याला महत्त्व द्यायला हवं.
  • ज्यांना आता उद्योग नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करायची आणि आम्ही त्यांना उत्तर द्यायचे.
  • याच्यातून मी काय साधणार आणि राज्यातली जनता काय साधणार आहे याचाही विचार केला पाहिजे.
  • ज्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशांना आम्ही उत्तर देऊ.
  • त्यांच्या वक्तव्याला फार काही महत्त्व देण्याचे कारण नाही.

काय म्हणाले होते सुजय विखे पाटील?

  • महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे.
  • राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे.
  • त्यानं काहीही मनमानी करावी, त्याला कुणी काही बोलत नाही.
  • शिवसेना एका मुक्या बायकोसारखी आहे, जिला बोलता येत नाही.
  • आणि काँग्रेसवाले वराती आहेत. ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती, पण ते बिन बुलाए जेवायला गेले आहेत. त्यांना लाज नाहीये.
  • ते जेवायचं ताटही सोडत नाहीयेत. त्यांना हाणलं तर खाली बसून जेवतील पण ते लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाहीत.
  • नवरा मस्त मजा करतोय.
  • ही मूक बायको, तिला झालेला त्रास सहन करायचा आहे.
  • सवत जर आणली तर माझं काय.
  • म्हणून ते मूक बायकोच्या भूमिकेत आहेत.

 

“काँग्रेस बाप आहे, बापच राहणार” – नाना पटोले

  • विखेंच्या विधानावर नाना पटोलेंनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
  • “काँग्रेस बाप आहे, बापच राहणार” असे ते म्हणाले.
  • “सुजय विखे नवखे आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही,” असेही पटोले म्हणाले.
  • सध्या महाराष्ट्रात भाजपतर्फे जनतेचे मनोरंजन सुरू आहे.
  • पण ते ऐकून-ऐकून जनतेचे कान बधीर झालेले आहेत, असेही ते म्हणालेत.

Tags: ajit pawarBJPCongressMVAnana patoleNCPShivsenaअजित पवारकाँग्रेसनाना पटोलेभाजपामहाविकास आघाडीराष्ट्रवादीशिवसेनासुजय विखे पाटील
Previous Post

यशवंत जाधवांवर जमीन खरेदीचा आरोप करताना सोमय्यांची छोटीशी भूल…ट्विटरवर सूर्यकांत दळवी…टीव्हीवर सिताराम दळवी!

Next Post

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम – साखर आयुक्त शेखर गायकवाड

Next Post
Sugar Factory

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम - साखर आयुक्त शेखर गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!