Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यशवंत जाधवांवर जमीन खरेदीचा आरोप करताना सोमय्यांची छोटीशी भूल…ट्विटरवर सूर्यकांत दळवी…टीव्हीवर सिताराम दळवी!

या आठवड्यातील आघाडीला हादरवणाऱ्या पाच प्रकरणांची सोमय्यांकडून घोषणा, सहावं प्रकरण जमीनीचं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kirit Somaiyya

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आजपासून सुरु झालेल्या आठवड्यासाठीचा अजेंडा जाहीर केला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारमधील घोटाळेबाजांविरोधातील महत्वाच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे, असं सोमय्या म्हणालेत. त्यांनी न्यायालयातील पाच प्रकरणांच्या सुनावणीची माहिती देतानाच स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या जमीन व्यवहाराच्या चौकशीला सुरुवात करणार असल्याचे सांगितले. या जमीन व्यवहाराविषयी बोलताना सोमय्या यांच्याकडून मोठा संभ्रम करणारी एक छोटीशी भूल झाली. त्यांनी टीव्ही चॅनल्सशी बोलताना भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांचे सासरे आणि मनसेचे नेते दळवी यांचे वडिल सिताराम दळवी यांचे नाव घेतले. त्यामुळे एक प्रकारे किरीट सोमय्या हे भाजपा आणि मनसे नेत्यांच्या नातेवाईकांच्या व्यवहाराचीही चौकशी करणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मात्र, प्रत्यक्षात ट्विटरवर मात्र सोमय्या यांनी शिवसेनेचेच माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे नाव दिले. त्यामुळे संभ्रमाचा वेगळाच खेळ रंगला.

 

सोमय्यांनी जाहीर केलेला आठवड्याचा आघाडीला हादरवणारा अजेंडा!

  • परिवहनमंत्री अनिल परबांविरोधात ३० मार्चला सुनावणी
  • ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफांविरोधात पुणे न्यायालयात सुनावणी
  • महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात मुंबई न्यायालयात
  • किरीट सोमय्यांच्या याचिकेवर कोरोना घोटाळाप्रकरणी मुंबई न्यायालयात
  • खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांविरोधात मुंबई न्यायालयात
  • स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांच्या जमीन व्यवहाराची चौकशी

 

सोमय्यांच्या हिटलिस्टमध्ये यशवंत जाधवांची शिवसेना माजी आमदाराकडूनची जमीन खरेदी!

  • किरीट सोमय्या यांनी जाहीर केलेल्या हिटलिस्टमधील सहाव्या क्रमांकावरील नाव यशवंत जाधवांच्या जमीन व्यवहाराचे आहे.
  • सोमय्या यांनी यशवंत जाधवांनी दापोलीत केलेल्या कथित ६२ एकर जमीन व्यवहाराची माहिती दिली आहे.
  • सोमय्यांच्या आरोपांनुसार यशवंत जाधवांनी शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडून ही जमीन खरेदी केली आहे.
  • टीव्हीवरील मुलाखतीमध्ये सोमय्या यांनी सूर्यकांत दळवी यांच्याऐवजी सिताराम दळवी यांचे नाव घेतले होते.
  • शिवसेनेचे माजी आमदार सिताराम दळवी हे भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांचे सासरे आहेत.
  • तर मनसेचे नेते संदीप दळवी यांचे वडिल आहेत.
  • तर शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे दापोली मतदारसंघातील नेते आहेत.
  • शिवसेना नेते रामदास कदम यांच्याशी झालेल्या वादामुळे ते मध्यंतरी चर्चेत आले होते.

क्षमस्व!

जाधवांवर जमीन खरेदीचा आरोप करताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडून माजी आमदार सूर्यकांत दळवींऐवजी माजी आमदार सिताराम दळवींचे टीव्हीवर नाव घेतले गेले. ते प्रत्यक्षात बोलत असल्याने बातमीत त्यांच्याच नावाचा, स्वाभाविकच त्यांच्या नातेवाईकांच्या नावांचाही उल्लेख झाला. पण तसे असले तरी मुक्तपीठवर चूक जाणे योग्य नाही. त्याबद्दल क्षमस्व!

  • तुळशीदास भोईटे, संपादक, मुक्तपीठ

Tags: Ashish ShKirit SomaiyamnsShivsenaSitaram Dalviआशिष शेलारकिरीट सोमय्याभाजपामनसेयशवंत जाधवशिवसेनासिताराम दळवी
Previous Post

महागाईविरोधात ३१ मार्चपासून काँग्रेसचा राज्यव्यापी ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन सप्ताह! : नाना पटोले

Next Post

“राष्ट्रवादी नवरा, शिवसेना मूक बायको, काँग्रेस जेवणापुरते वराती!” विधानावरून विखेXपवारXपटोले जुंपली!

Next Post
sujay vikhe patil

"राष्ट्रवादी नवरा, शिवसेना मूक बायको, काँग्रेस जेवणापुरते वराती!" विधानावरून विखेXपवारXपटोले जुंपली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!