Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम – साखर आयुक्त शेखर गायकवाड

राज्यात कोल्हापूर, सांगलीचा वाटा सर्वाधिक

March 28, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Sugar Factory

मुक्तपीठ टीम

ऊस पिकाची विश्वासअर्हता वाढत चालली असून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून ऊसाची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर देण्यासाठी साखर आयुक्तालय सातत्याने प्रयत्न करीत आहे. या स्थितीत वाढत्या साखर उत्पादनामुळे महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या सर्व देशांपेक्षा जास्त साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. ब्राझीलबरोबर महाराष्ट्र ऊस व इथेनॉल उत्पादनाबाबत स्पर्धा करत आहे. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याची ही नांदी आहे, असे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले. चालू वर्षी महाराष्ट्राने ऊस गाळप, साखर उत्पादनात देशात प्रथम क्रमांक मिळवला असून सन २०२१-२२ मध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रात ११ कोटी १२ लाख ३४ हजार मेट्रीक टन ऊस गाळप तर ११ कोटी ५४ लाख १८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू वर्षी १०.३८ टक्के साखर उतारा मिळाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 

साखर आयुक्त शेखर गायकवाड याबाबत अधिक माहिती देताना म्हाणाले, देशात साखर उत्पादनात मागील दोन ते तीन वर्षे उत्तरप्रदेश अग्रस्थानी होते. तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी राहिला होता. हे चित्र चालू वर्षी बदलले असून महाराष्ट्राने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात उत्तरप्रदेशला मागे टाकत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. उत्तरप्रदेशमध्ये ७ कोटी ६८ लाख मेट्रीक टन ऊस गाळप तर सुमारे ८० लाख मेट्रीक टन साखर उत्पादन झाले आहे. तर महाराष्ट्राने ११ कोटी १२ लाख ३४ हजार मेट्रीक टन ऊस गाळपातून ११ कोटी ५४ लाख १८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. महाराष्ट्राने उत्तरप्रदेशच्या तुलनेत सुमारे ३५ लाख क्विंटलहून अधिक साखरेचे जादा उत्पादन घेतले आहे. तर राज्यात गतवर्षीच्या तुलनेत १ कोटी ५७ लाख ३२ हजार क्विंटल जादा साखरेचे उत्पादन घेतले आहे. चालू वर्षी हंगाम अखेर महाराष्ट्रच आघाडीवर राहील.

 

देशपातळीवर चालू वर्षी ३ कोटी ४७ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा १ कोटी २५ लाख मेट्रीक टन राहील. तसेच देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा वाढून तो जवळपास ३९ टक्क्यावर पोहोचेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र प्रथम तर राज्यात कोल्हापूर विभाग अग्रेसर आहे. महाराष्ट्राचे एकूण साखर उत्पादन ११ कोटी ५४ लाख १८ हजार क्विंटल असून यामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्याने २ कोटी ८८ लाख ७९ हजार ७१२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. महाराष्ट्रात साखरेचा सर्वाधिक म्हणजे ११.७५ टक्के उतारा कोल्हापूर विभागात मिळाला आहे.
सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात सहकारी तत्वावरील ९८ तर खाजगी तत्वावरील ९९ असे एकूण १९७ साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले होते. यामध्ये कोल्हापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २९, सोलापूर विभागातील ४६, अहमदनगर विभागातील २७, औरंगाबाद विभागातील २५, नांदेड २७, अमरावती ३ व नागपूर विभागातील ४ अशा साखर कारखान्यांचा समावेश आहे.
या हंगामामध्ये कोल्हापूर विभागात एकूण २ कोटी ४५ लाख ६८ हजार ४५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून २ कोटी ८८ लाख ७९ हजार ७१२ क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. पुणे विभागात एकूण २ कोटी २६ लाख ७७ हजार ५५३ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून २ कोटी ४० लाख ८६ हजार ७४५ क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. सोलापूर विभागात एकूण २ कोटी ६१ लाख ९ हजार २७४ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून २ कोटी ४५ लाख ३ हजार ४० क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. अहमदनगर विभागात एकूण १ कोटी ५५ लाख ९५ हजार ७७ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून १ कोटी ५४ लाख ७७ हजार ४८५ क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. औरंगाबाद विभागात एकूण ९६ लाख ७० हजार ३८० मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून ९५ लाख ९ हजार १९० क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. नांदेड विभागात एकूण १ कोटी १२ लाख ५९ हजार ८७१ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून १ कोटी १७ लाख ८४ हजार ५२५ क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. अमरावती विभागात एकूण ८ लाख ९ हजार ४६० मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून ७ लाख ६४ हजार ७२५ क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. नागपूर विभागात एकूण ४ लाख १२ हजार २०५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून ३ लाख ५६ हजार ७६० क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे.


Tags: MaharashtraSugar Productionकोल्हापूरमहाराष्ट्रसाखर आयुक्त शेखर गायकवाडसाखर उत्पादनसांगली
Previous Post

“राष्ट्रवादी नवरा, शिवसेना मूक बायको, काँग्रेस जेवणापुरते वराती!” विधानावरून विखेXपवारXपटोले जुंपली!

Next Post

काश्मीर फाइल्सनंतर आता काश्मीरमध्ये कार्यक्रम, सरसंघचालक ऑनलाईन संबोधित करणार!

Next Post
Kashmiris New year

काश्मीर फाइल्सनंतर आता काश्मीरमध्ये कार्यक्रम, सरसंघचालक ऑनलाईन संबोधित करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!