मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत अजित पवारांनी भाषण टाळलं, ते मंचावरून गायब झाले आणि माध्यमांमध्ये त्यांच्या नाराजीच्याच नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीच्या चर्चाही रंगल्या. पण आज स्वत: विरोधी पक्षनेते अजित पवार पुढे सरसावले, त्यांनी माध्यमांनी उगाच भलता अर्थ काढल्याचा दावा केला.
माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला…
- राष्ट्रवादीचं काल अधिवेशन पार पडलं.
- पक्षाच्या वाटचालीबद्दल अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केलं.
- महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.
- राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे प्रमुख भूमिका मांडत असतात.
- त्यामुळे मी बोलणं टाळलं.
- माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला.
- वास्तविक तिथे मला कुणी बोलू नका, असं सांगितलं नव्हतं.
- मीच बोलायचं नाही, अशी भूमिका घेतली.
वस्तुस्थितीला धरुन बातम्या असाव्यात!!
- बरं मी एकटाच बोललो नाही असं ना.
- वेळेअभावी सुनील तटकरे, वंदना चव्हाण, वेगवेगळ्या राज्यातले प्रतिनिधी यांनाही बोलता आलं नाही.
- मी नंतर मराठी मीडियाशी चर्चा केली.
- मी का बोललो नाही, याचं कारण मीडियाला सांगितलं. आपापली भूमिका मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.
- पण वस्तुस्थितीला धरुन बातम्या असाव्यात.
गैरसमज दूर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद!!
- १९९१ ला मी खासदार झालो.
- गेली ३५ वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे.
- पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशाला मी उपस्थिती लावतो.
- पण बऱ्याच वेळा मी राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करत नाही.
- राज्यामध्ये सभा, अधिवेशन, चर्चा असतील तर मात्र मी बोलत असतो.
- मी नाराज असल्याचे गैरसमज दूर करुन राज्यासमोरचे प्रश्न आणि सरकराची चुकीची धोरणं यावर बोलण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली.