मुक्तपीठ टीम
एअर इंडियाच्या पॅरिस-दिल्ली फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केल्याची डीजीसीएने दखल घेतली आहे. डीजीसीएने म्हटले आहे की इन-फ्लाइट सर्व्हिसेस, एअर इंडियाचे संचालक आणि त्या फ्लाइटच्या पायलट आणि केबिन क्रू मेंबर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. डीजीसीएने असेही म्हटले आहे की त्यांनी त्यांचे कर्तव्ये पार न पाडल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करू नये?
नेमकं प्रकरण काय?
- फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिलेच्या ब्लँकेटवर लघवी केली.
- आरोपीने माफी मागितल्यानंतर त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.
- ६ डिसेंबर रोजी पॅरिसहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक १४२ मध्ये ही घटना घडली होती.
- विमानाच्या पायलटने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेल्या माहितीनंतर आरोपी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले.
- ताब्यात घेतल्यानंतर आरोपी प्रवाशाने सहप्रवाशाकडे लेखी माफी मागितली होती.
- दोघांमध्ये सामजस्य झाल्यानंतर आरोपीला सोडण्यात आले.
- जेव्हा विमान सकाळी विमानतळावर उतरले तेव्हा विमानतळ सुरक्षा अधिकार्यांना सांगण्यात आले की पुरुष प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता, क्रूच्या सूचनांचे पालन करत नव्हता आणि त्याने एका महिलेच्या ब्लँकेटवर लघवी केली होती.
- विमानातील प्रवाशांची दखल घेतल्यानंतर प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले.
न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्येही घडली होता अशीच घटना…
- या घटनेच्या १० दिवस आधी म्हणजेच २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये अशीच एक घटना घडली होती.
- यामध्ये एका व्यक्तीने आपल्या सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप होता.
- या घटनेत महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
- यासोबतच आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.