मुक्तपीठ टीम
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आज एक दिवसीय बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या, खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.
बिहारमध्ये आदित्य ठाकरेंचं जोरदार स्वागत!!
- आदित्य ठाकरे यांचे पटणा येथील विमानतळावर शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले.
- फुलांची उधळण करत, फटाक्यांची आतिशबाजी करत शिवसैनिकांनी उत्साहात आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
- आदित्य ठाकरे, तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
- येथे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
- तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचं शिवाजी महाराज यांची अर्धाकृती मूर्ती देत स्वागत केलं.
- बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर असल्यामुळे विरोध आणि समर्थन या दोन्ही गोष्टी घडत आहेत.
आदित्य ठाकरेंचा शिंदे – फडणवीस सरकारला खोचक टोला!
- आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आजची भेट ही दोन तरुण नेत्यांमध्ये आहे.
- आम्ही आमच्या कामावर चर्चा केली, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
- सरकारला टोला लगावत आदित्य ठाकरे म्हणाले, मंत्रिमंडळ गुजरात निवडणूक प्रचारात व्यस्त आहे.
- सरकारला गुजरात निवडणुकांसाठी वेळ आहे.
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज बैठकीला एक तास दिला असता तर काय बिघडलं असतं.
- महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे.
- प्रचार करणं आवश्यक आहे, पण महाराष्ट्रासाठी यांचाकडे एक तास नाही.