मुक्तपीठ टीम
एडीफोरऑल या डिजिटल फॉर्मल एज्युकेशन व्यासपीठाने भारताच्या आठ जिल्ह्यांमधील ४०० विद्यार्थीनींना स्कॉलरशिप्स देण्यासाठी मायक्रोसॉफ्टसोबत सहयोग केला. हरियाणामधील फरिदाबादपासून या उपक्रमाची सुरूवात झाली आहे. ‘बीएलईएपी स्कॉलरशिप फॉर वुमेन ऑफ टूमारो’ मुलींना एनआयओएस व एमएस लर्न अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण घेण्याची सुविधा देईल. तसेच एडीफोरऑल व मायक्रोसॉफ्ट मुलांना डिवाईसेसवर डिजिटल कन्टेन्ट उपलब्ध करून देण्यासाठी देशभरातील एनआयओएस स्टडी सेंटर्समध्ये अद्वितीय डिजिटल लायब्ररी बीएलईएपी मायक्रोसॉफ्ट सेंटर ऑफ एनआयओएस एक्सलन्स उभारणार आहे.
दोन्ही परिवर्तनात्मक उपक्रम मुलींना यशस्वीपणे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करत त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवण्यामध्ये मदत करतात. एआय (AI) व अझ्योर (Azure) सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासोबत उपक्रम मायक्रोसॉफ्ट व पीअरसन्स सर्टिपोर्टचे व्यापक प्रमाणित तंत्रज्ञान कोर्सेस उपलब्ध करून देण्यास आणि त्यांना कर्मचारीवर्गामध्ये सामील होण्यास सक्षम करण्यास सज्ज आहे.
याप्रसंगी बोलताना आदिग्रुपचे अध्यक्ष व एडीफोरऑल चे सह-संस्थापक संजय विश्वनाथन म्हणाले, ”आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून भारतामध्ये बदल घडवून आणण्याचा समान मनसुबा असलेल्या मायक्रोसॉफ्टसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. अत्यंत किफायतशीर दरात अधिकृत शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या एकमेव हेतूने बीएलईएपी सादर केले. मायक्रोसॉफ्टसोबतचा सहयोग म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची रोजगारक्षमता वाढवणारे संबंधित प्रगत तंत्रज्ञान व कौशल्ये उपलब्ध होतील. आम्हाला मॅककिन्से स्टडीमधून समजले की, भारत शाळांमध्ये मुलींना आणत, त्यांना शिक्षण देत आणि त्यांना रोजगारासाठी सक्षम करत जीडीपीमध्ये २५ टक्क्यांची भर करू शकतो. योग्यवेळी सादर करण्यात आलेला आमचा उपक्रम सध्या महामारी काळामध्ये भारतासाठी यथायोग्य आहे.”
मायक्रोसॉफ्टच्या शैक्षणिक व सार्वजनिक विभागाचे कार्यकारी संचालक नवतेज बाल म्हणाले, ”भारताचे डिजिटल परिवर्तन प्रत्येक उद्योगक्षेत्रामध्ये तंत्रज्ञान सक्षम रोजगारासाठी मागणीला चालना देत आहे आणि यासोबतच डिजिटल कौशल्यासाठी गरज निर्माण झाली आहे. आम्ही भारतीय तरूणांना भावी रोजगारांसाठी सुसज्ज करणाऱ्या डिजिटल कौशल्ये व शैक्षणिक इकोप्रणाली निर्माण करण्यामध्ये सखोल गुंतवणूक केली आहे. तरूणींना समान संधी देण्यासोबत डिजिटल कौशल्ये उपलब्ध करून देणे हा या प्रवासामधील महत्त्वपूर्ण भाग आहे आणि एडीफोरऑल सोबतचा आमचा सहयोग यादिशेने एक प्रबळ पाऊल आहे.”
फरिदाबादमध्ये ‘बीएलईएपी स्कॉलरशिप फॉर वुमेन ऑफ टूमारो’च्या सादरीकरणाबाबत बोलताना लैंगिक व सामाजिक समानता मूल्ये जोपासणारे इक्रा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष शफी मोहम्मद म्हणाले, ”१४०० वर्षांपूर्वी पैंगबर मुहम्मद यांनी त्यांच्या काळात मुलगा-मुलगी आणि इस्लाम किंवा इतर धर्मांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यांचा सर्वांना शिक्षण मिळण्यावर विश्वास होता, ज्यामुळे हुशार समाज सुसंगत व समृद्धपणे राहू शकतो. म्हणूनच, त्यांनी दोघांना समान शिक्षण दिले. हेच मूल्य आजच्या व भावी समाजामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून रूजवण्याची माझी इच्छा आहे. मला हे ध्येय संपादित करण्यासाठी आणि फरिदाबादला २१व्या शतकातील भक्कम आधार बनवण्यासाठी माझ्यासोबत आदिग्रुप, एडीफोरऑल व मायक्रोसॉफ्ट सहयोग करण्याने अत्यंत सन्माननीय वाटत आहे.”
मायक्रोसॉफ्टद्वारे समर्थित बीएलईएपी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी पाया भक्कम करण्यास मदत करण्यासाठी उपलब्धता, सोईस्करता, कार्यक्षमता व किफायतशीर पैलूंसह नियमित शालेय शिक्षणासाठी डिझाइन व विकसित करण्यात आला आहे. बीएलईएपी हे एनआयओएस (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग) आणि मायक्रोसॉफ्ट लर्न अभ्यासक्रमावर आधारित परिपूर्ण शालेय शिक्षणासाठी अनोखे डिजिटल उत्पादन आहे. देशभरातील लाखो
विद्यार्थ्यांसोबत जीवनातील सुरूवातीच्या काळात शिक्षण मिळू न शकलेल्या मुलांना ऑनलाइन अभ्यास करण्यास, शिकण्यास, परीक्षा देण्यास आणि औपचारिक शालेय शिक्षण पूर्ण करण्यास सक्षम करण्याचा या उपक्रमाचा मनसुबा आहे. विद्यार्थी त्यांची गती, वेळ, स्थळ व अध्ययन क्षमतेनुसार शिक्षण घेऊ शकतात. शिक्षण मंत्रालय (भारत सरकार) आणि मायक्रोसाफ्ट अंतर्गत स्वायत्त संस्था एनआयओएसकडून शासकीय मान्यताकृत व वैध प्रमाणपत्र उपलब्ध असण्यासह विद्यार्थ्याला बीएलईएपीमध्ये असलेल्या औपचारिक शालेय शिक्षणाच्या प्रत्येक पैलूचा अधिकार आहे.