मुक्तपीठ टीम
तेलंगणातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अभिनेत्री पूनम कौरचा हात धरल्याचा फोटो व्हायरल होत आहे. शनिवारी भाजपा नेत्या प्रीती गांधी यांनी हा फोटो पोस्ट करताना अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्याला पूनम कौरने प्रत्युत्तर दिले आहे. राहुल यांनी तिचा हात का धरला हे अभिनेत्रीने सांगितले आहे.
पूनम कौरने दिलं प्रत्युत्तर
पूनम कौरने ट्वीट करत, हे अपमानास्पद आहे, लक्षात असूदे की, पंतप्रधानांनी नारी शक्तीबद्दल सांगितले होते. मी जवळजवळ घसरली आणि पडणारच होते तेव्हा सरांनी माझा हात धरला, असल्याचे ती म्हणाली.
This is absolutely demeaning of you , remember prime minister spoke about #narishakti – I almost slipped and toppled that’s how sir held my hand . https://t.co/keIyMEeqr6
— पूनम कौर ❤️ poonam kaur (@poonamkaurlal) October 29, 2022
पुढे तिने लिहिले की, तेलंगणा काँग्रेसने शेअर केलेल्या त्याच फोटोवर राहुल गांधींचे कौतुक करताना पूनम म्हणाली की, महिलांबद्दलची त्यांची काळजी, आदर आणि संरक्षणात्मक स्वभाव माझ्या हृदयाला भिडला. विणकरांच्या समस्या ऐकल्याबद्दल मी राहुल गांधी यांच्यासह विणकरांच्या टीमचे मनापासून आभार मानते.
प्रियांका चतुर्वेदींची कठोर भूमिका:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी कठोर भूमिका घेत पूनम कौर यांचा बचाव केला.
त्या म्हणाल्या की, “पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणार्या महिला देशाला पुढे नेण्याची प्रेरणा देतात, असे तुमचे म्हणणे असेल, तर पंडित नेहरूंच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे समान भारताचे स्वप्नही साकार होईल. कृपया खाली बसा. ”
काँग्रेसचा प्रीती गांधींवर हल्लाबोल-
- जयराम रमेश यांनी प्रीती गांधी यांचे वर्णन ‘विकृत आणि कमजोर मनाची महिला’ असे केले आहे.
- काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या की, राहुल गांधी खरे तर आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाला एकत्र आणत आहेत.
- पवन खेरा यांनी लिहिले, ‘तुम्हाला उपचारांची गरज आहे, तुमची मानसिक स्थिती तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी हानिकारक ठरू शकते.’
भारत जोडा यात्रा: राहुल गांधी तरुणीसोबत चालताच भाजपाकडून आक्षेपार्ह ट्वीट! वाचा नेटकऱ्यांचा संताप…