Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर गदा नको!’; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या विरोधी महाविकास आघाडीची कृती

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं नवं पाऊल उचलत ओबीसी आरक्षणावर तोडगा म्हणून मध्य प्रदेशमधील कायद्याच्या धर्तीवर प्रभाग रचना, सदस्य संख्या निश्चित करणे इत्यादी सारे अधिकार राज्य निवडणूक आयोगाऐवजी सरकारने स्वत:कडे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मात्र काही कायतज्ज्ञांनी राज्य सरकारचा हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टीकणे कठीण असल्याचे म्हटले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेणे बंधनकारक…

  • राज्यघटनेतील २४३ के आणि अन्य कलमांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेण्याचे बंधन आहे.
  • त्यासाठी ७३ व ७४व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली असून स्वतंत्र आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कलम ३२४ नुसार आयोगाला अधिकार देण्यात आले आहेत.
  • गुजरातमधील अहमदाबाद महापालिकेतील प्रभाग रचनेच्या मुद्दय़ावर किशनसिंग तोमर यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर तत्कालीन सरन्यायाधीश वाय.के. सभरवाल यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने १९ ऑक्टोबर २००६ रोजी निकाल दिला होता.
  • त्यानुसार राज्य सरकारला निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसून निवडणुका मुदतीत घेण्याचे घटनात्मक बंधन असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
  • महानगरपालिका, नगरपालिका किंवा पंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यापासून निवडणुकांची सारी प्रकिया ही राज्य निवडणूक आयोगाकडून पार पाडली जावी, असे त्या निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले होते.

राज्य मंत्रिमंडळाची ही कृती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात

  • राज्य मंत्रिमंडळाने काही अधिकार आपल्याकडे घेण्याची कृती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात असल्याकडे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.
  • ही पार्श्वभूमी लक्षात घेता कायद्याच्या कसोटीवर राज्य विधिमंडळाने कायदा मंजूर केला तरी तो टिकणे कठीण आहे.

Tags: MaharashtraMva govtOBC reservationSupreme Courtओबीसी आरक्षणमहाराष्ट्रराज्य सरकारसर्वोच्च न्यायालय
Previous Post

भाजपाच्या समीर ठक्करविरोधात आता मनपा आयुक्तांची तक्रार, खोटी माहिती ट्वीट केली!

Next Post

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी जीव मुठीत धरून,अशा परिस्थितीत पंतप्रधानांचा पुणे दौरा!

Next Post
Sharad pawar on modi

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी जीव मुठीत धरून,अशा परिस्थितीत पंतप्रधानांचा पुणे दौरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!