मुक्तपीठ टीम
पुणे-बंगळुरू महामार्गावर नेहमीच अपघात होत असतात. रविवारी घडलेली घटना ही भयानक आहे. रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर झालेल्या अपघातात ४८ वाहनांचे नुकसान झाले. ब्रेक फेल झाल्यामुळे किंवा ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने या वाहनांना धडक दिल्याने ही घटना घडली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे अग्निशमन दलाने घटनास्थळी बचाव पथके पाठवत बचाव कार्य सुरु केले. या अपघातात सहा लोक जखमी झाले आहेत. त्यांचावर उपचार सुरु आहेत. महामार्गावर असे अपघात वारंवार का होतात? ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? या विषयी सविस्तर जाणून घेवूया…
वेगावर नियंत्रण ठेवा
- महामार्गावर गाडी चालवत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
- ज्या वेगाला हाताळता येत त्याच वेगाने वाहन चालवा.
- अनेक वेळा अतिवेग आणि अतिआत्मविश्वासामुळे लोक मोठ्या अपघातांना सामोरे जातात.
लेनमध्ये गाडी चालवा –
- गाडी हायवेवर चालवताना त्याच लेनमध्ये चालवण्याचा प्रयत्न करा.
- लेन बदलायची असेल तर मागून येणाऱ्या वाहनाला सिग्नल द्या आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या इतर वाहनांवर लक्ष ठेवा.
- मिरर पण ठेवा.
- समोरून जाणार्या वाहनापासून योग्य अंतर राखा.
अतिविचार टाळा-
- हायवेवर लांब प्रवास करताना गाडी चालवता असताना विचार करत असतात.
- अनेक वेळा जास्त विचार केल्याने लोकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते, त्यामुळे अपघात होतो.
बीमलाइटचा योग्य वापर करा –
- कारमध्ये हाय बीम लाइटचा वापर करावा.
- महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर समोरून येणारी वाहने दुभाजकाच्या पलीकडे धावत असतात.
- गाडी चालवताना इतर कार किंवा तुमच्या कारचा हाय बीम लाइट तुम्हाला किंवा इतर कोणालाही त्रास देत नाही.