Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘आधार’ वापराचं प्रमाण वाढतंच, ऑगस्टमध्ये २३ कोटी ४५ लाख ई- केवायसी व्यवहार

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
E-KYC Transactions

मुक्तपीठ टीम

देशातील नागरिक आधारचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि स्वीकार करत असल्याचे दिसून आले आहे. ऑगस्ट महिन्यात आधारच्या माध्यमातून २१९.७१ कोटी प्रमाणीकरण व्यवहार करण्यात आले; जुलै २०२२ च्या तुलनेत या प्रमाणात ४४% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. यावरून आधारमुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सोपे होत असल्याचे अधोरेखित होते.

यापैकी बहुतांश व्यवहार बोटांचे ठसे घेवून बायोमेट्रिक प्रमाणीकरण (१२८.५६ कोटी) वापरून केले आहेत. त्या खालोखाल भौगोलिक प्रमाणिककरण आणि ओटीपी प्रमाणिकरणाचा वापर करण्यात आला.

ऑगस्ट २०२२ अखेरपर्यंत आधार प्रमाणीकरणांची एकूण संख्या ८०७४.९५ कोटी इतकी झाली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस ही एकूण संख्या ७८५५.२४ कोटी इतकी होती.

ऑगस्ट महिन्यात आधारव्दारे झालेल्या ई-केवायसी व्यवहारांची संख्या २३.४५ कोटी आहे. जुलै महिन्यातील एकूण ई-केवायसी व्यवहारांची संख्या १२४९.२३ कोटी इतकी होती, ती वाढून, ऑगस्टअखेरपर्यंत १२७२.६८ कोटी इतकी झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात नागरिकांनी १.४६ कोटी आधार यशस्वीपणे अद्ययावत केले आणि नागरिकांच्या विनंतीनुसार आतापर्यंत ६५.०१ कोटी आधार क्रमांक अद्ययावत करण्यात आले आहेत.

त्याशिवाय आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (एईपीएस) च्या माध्यमातून आणि मायक्रो एटीएम जाळ्याच्या माध्यमातून १५२८.८१ कोटी बँकिंग व्यवहार झाले आहेत. यापैकी सुमारे २२ कोटी व्यवहार एकट्या ऑगस्ट महिन्यात झाले आहेत. यामुळे तळागाळातील लोकांना आर्थिक समावेशनाच्या कक्षेत समाविष्ट करणे शक्य झाले आहे.

 


Tags: Aadhaar cardBiometric AuthenticationCitizen AadhaarE-KYC Transactionsgood newsmuktpeethआधार कार्डई- केवायसी व्यवहारचांगली बातमीनागरिक आधारबायोमेट्रिक प्रमाणीकरणमुक्तपीठ
Previous Post

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत!

Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियात विविध पदांवर ११० जागांसाठी करिअर संधी

Next Post
Central Bank of India

सेंट्रल बँक ऑफ इंडियात विविध पदांवर ११० जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!