Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Nari Shakti Award

मुक्तपीठ टीम

सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

हा पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचा असून अर्जदारास यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला नसावा (या पूर्वी मंत्रालयाने प्रदान केलेला स्त्री शक्ती पुरस्कारांसह) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय दि. १ जुलै २०२२ रोजी २५ वर्ष पूर्ण असावे. (दिव्यांग व्यक्तीचे वय दि. ८ मार्च २०२२ रोजी २५ वर्ष पूर्ण असावे)

नारी शक्ती पुरस्कार उत्कृष्ट कार्यासाठी शक्यतो अपवादात्मक परिस्थितीत, महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण किंवा या विषयाशी संबंधित किंवा अनुषंगिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रदान केला जाऊ शकतो. ज्यांनी महिलांना निर्णय घेण्याच्या भूमिकेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले, पारंपरिक आणि अपारंपरिक क्षेत्रात महिलांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन दिले, ग्रामीण महिलांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, महिलांना गैर – पारंपरिक क्षेत्र जसे की विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती, सुरक्षितता, आरोग्य आणि निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिलांचा आदर आणि प्रतिष्ठा इत्यादींच्या दिशेने ठोस आणि लक्षणीयरित्या प्रोत्साहन दिले अशा व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली जाऊ शकते. एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला देखील हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. ज्याने बाल लिंग गुणोत्तर (CSR) मध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केल्यावर मृत्यू झाल्याची प्रकरणे वगळता सामान्यतः पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाणार नाही. वरीलप्रमाणे कार्य केलेल्या व्यक्ती, राज्य व केंद्रशासित प्रदेश यांनी ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी केंद्र सरकारच्या www.narishaktipuraskar.wcd.gov.in किंवा www.wcd.nic.in या संकेतस्थळावर दि ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. हे प्रस्ताव फक्त ऑनलाईनद्वारेच स्वीकारले जातील, असे मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 


Tags: District Women and Child Development Officergood newsmuktpeethmumbaiNari Shakti AwardProposalचांगली बातमीजिल्हा महिला व बालविकास अधिकारीनारी शक्ती पुरस्कारप्रस्तावमुक्तपीठमुंबई
Previous Post

‘चला जाणुया नदीला’ अभियानाचा गांधी जयंतीला शुभारंभ! जाणून घ्या हे अभियान आहे तरी काय…

Next Post

‘आधार’ वापराचं प्रमाण वाढतंच, ऑगस्टमध्ये २३ कोटी ४५ लाख ई- केवायसी व्यवहार

Next Post
E-KYC Transactions

'आधार' वापराचं प्रमाण वाढतंच, ऑगस्टमध्ये २३ कोटी ४५ लाख ई- केवायसी व्यवहार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!