मुक्तपीठ टीम
टीव्ही मालिका अलिबाबामधील अभिनेत्री तुनिषा शर्माने काल टीव्ही सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा सहकलाकार शीजान खानला अटक केली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिषाच्या आईने त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला मुंबईतील वसई न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सर्वजण, तुनिषा शर्मा प्रकरणात सत्य बाहेर येण्याची वाट पाहत आहेत. तसेच, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्यास सांगितले आहे.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ते सेटवर गेले असताना, लोक तिथे काहीही सांगायला घाबरत आहेत. अनेक अभिनेत्रींनी त्यांना फोन करून सांगितले की ही हत्या आहे आणि त्यांना याची भिती वाट आहे. यामुळे ते एसआयटीद्वारे चौकशीची मागणी करत आहेत.
पोलीस चौकशीत शीजान खानने कोणती माहिती दिली?
- मिळालेल्या माहितीनुसार असा दावा करण्यात आला आहे की, शीजान खानने आपल्या जबानीत पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे.
- सुरुवातीच्या तपासात त्याने तुनिषासोबत संबंध असल्याचे सांगितले.
- त्यांचे धर्म भिन्न होते आणि वयातही मोठा फरक होता, त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.
- मात्र शीजानच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणे पोलिसांना अवघड जात आहे.
तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात, डॉक्टरांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती…
- तुनिषाच्या कुटुंबीयांनी शीजानवर अनेक मुलींसोबत अफेअर असल्याचा आरोप केला आहे. यामुळे तुनिषा डिप्रेशनमध्ये गेली.
- तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात तिच्या काकांनी एक महत्त्वाची माहिती उघड केली आहे.
- ते म्हणाला की तुनिषाचे वय २० वर्ष होते आणि ती डिप्रेशनमध्ये होती असा दावा केला जात आहे, तर २० वर्षांच्या मुलीला काय डिप्रेशन असेल.
- मेकर रूममध्ये शीजान आणि तिच्यामध्ये काहीतरी घडले असावे.
- तुनिषा लॉकडाऊनमध्ये दीड वर्ष त्याच्यासोबत होती आणि ती अजिबात दुःखी किंवा उदास नव्हती.
- काही दिवसांपूर्वी तुनिषाने डॉक्टरांना भेटून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले होते, असेही तिच्या काकांनी सांगितले.
- तिचा वापर करण्यात आला आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणाची पोलीस प्रत्येक बाजूने चौकशी करत आहेत. आतापर्यंत १४ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.