मुक्तपीठ टीम
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM Kisan) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत उपलब्ध करते. सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करतो. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी केली असेल आणि फॉर्ममध्ये काही चूका झाल्या असतील तर काही काळजी करण्याची गरज नाही. आपण घर बसल्या पीएम किसान योजनेच्या फॉर्ममधील कोणतीही चूक दुरुस्त करता येऊ शकते. यासंदर्भातील प्रक्रिया खुप सोपी आहे. पण यासाठी आपल्याला आधार कार्ड नंबरची आवश्यकता असेल.
पीएम किसान रजिस्ट्रेशन फॉर्ममधील चुका कशा दुरुस्त कराव्यात हे जाणून घेऊया…
- सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- वेबसाइट ओपन झाल्यावर उजव्या बाजूला ‘फार्मर कॉर्नर’ दिसेल.
- त्यातील ‘अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर्स’ या पर्यायावर क्लिक करा
- आता आधार क्रमांकासह कॅप्चा कोड लिहा आणि मग ‘सर्च’ पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल. आपण भरलेल्या सर्व प्रकारची माहिती या पेजवर उपलब्ध होतील.
- त्या पेजवर जी माहिती अपडेट करू इच्छिता ती करु शकतात.
- यासर्व प्रक्रियेनंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन फॉर्ममधील बदल केल्यानंतर आपण आपल्या अर्जाच्या स्थितीचा फक्त पीएम किसानच्या वेबसाइटवरुनच मागोवा घेऊ शकतो. यासाठी तुम्हाला ‘फार्मर्स कॉर्नर’ अंतर्गत ‘सेल्फ रजिस्टर्ड / स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे आपण आधार क्रमांक आणि कॅप्चा कोडद्वारे अर्जाची स्थिती देखील तपासू शकता.