मुक्तपीठ टीम
भारतीय अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्सने आता FMCG मार्केटमध्येही प्रवेश केला आहे. रिलायन्स ग्रुप ‘इंडिपेंडन्स’ ब्रँड अंतर्गत दैनंदिन वापराच्या वस्तू सादर करण्याच्या घोषणेसह पतंजली, आयटीसी, टाटा, अदानी यांच्याशी स्पर्धा करत आहे. कंपनीने ‘इंडिपेंडन्स’ ब्रँड राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची योजना आखली आहे. हा ब्रँड रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडची उपकंपनी आणि FMCG युनिटद्वारे सादर केला गेला.
रिलायन्स रिटेलने गुजरातमध्ये ‘इंडिपेंडन्स’ हा ब्रॅंड सादर केला. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘इंडिपेंडन्स’ ब्रँड अंतर्गत अनेक रेंजमध्ये उत्पादने सादर केली जातील. यामध्ये दैनंदिन वापरातील धान्य, प्रक्रिया केलेले अन्न आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश आहे.
‘इंडिपेंडन्स’ ब्रँड देशभरात सादर केला जाणार!
- ‘इंडिपेंडन्स’ हा ब्रँड संपूर्ण देशात आणला जाईल.
- २९ ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएम दरम्यान, आरआरव्हीएलच्या संचालक ईशा अंबानी यांच्या वतीने, FMCG व्यवसाय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.
- यावर, ईशा अंबानी म्हणाल्या की खाद्यतेल, डाळी, तृणधान्ये, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ आणि इतर दैनंदिन गरजेच्या उत्पादनांसह परवडणारी उत्पादने FMCG ब्रँड अंतर्गत ऑफर केली जातील.
- गुजरातला ‘गो-टू-मार्केट’ राज्य म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहे.
- हा ब्रँड भारतीय गरजांसाठी फायदेशीर आहे, भावनिक जोड निर्माण करतो.
- येत्या काही महिन्यांत संपूर्ण गुजरातमधील FMCG किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याची कंपनीची योजना आहे.
इंडिपेंडन्स ब्रँड अंतर्गत उत्पादने सध्या जिओ मार्ट अॅप आणि रिलायन्स रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असतील. येत्या काही महिन्यांत किराणा दुकानांमध्ये त्यांचे वितरण वाढविण्याची योजना आहे.