मुक्तपीठ टीम
जर तुम्ही हिरा खरेदी करणार असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे होऊ नये की घाईघाईने केलेल्या खरेदीत तुमची फसवणूक झाली. हिरा खरा आहे की खोटा हे कसे ओळखायचे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे जाणून घेऊया हिरा खरेदी करताना काही गोष्टी…
हिरा खरेदी करताना फोर सीकडे लक्ष द्या…
- डायमंड ज्वेलरी खरेदी करताना ‘फोर सी’ आणि ‘वन सी’ तपासून घ्या.
- एखादा हिऱ्याचे ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट नक्कीच तपासून पाहा.
- या प्रमाणपत्रात स्टॅम्प आणि स्वाक्षरी असणं आवश्यक आहे.
- आयआयजी आणि जीआयए प्रमाणपत्रं ही महत्त्वपूर्ण आहेत.
फोरसीचा अर्थ काय
- ‘फोर सी’ म्हणजे ‘कट’, ‘कलर’, ‘क्लॅरिटी’ आणि ‘कॅरेट’. तसेच, ‘ए सी’ म्हणजे ‘प्रमाणपत्र’.
- ‘कट’ चा अर्थ असा आहे की हिऱ्याला योग्य कटिंग (डायमंड कटिंग) आहे की नाही. डायमंड रिफ्लेक्शन योग्य आहे की नाही.
- क्लॅरिटी’ म्हणजे हिरा कोणत्या दर्जाचा आहे. ग्रेडमध्ये VVS1, VVS2, VS1, VS2, SI1 आणि SI2 यांचा समावेश आहे.
- ‘कॅरेट’ म्हणजे तुम्हाला किती कॅरेट खरेदी करायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार त्यांची निवड करू शकता.
अशाप्रकारे करा हिऱ्याची तपासणी-
- हिरा खरेदीवेळी ते बिलाशिवाय खरेदी करू नका. त्यामुळे डायमंडची विश्वसानियता तपासली जाऊ शकते. आयआयजी, जीआयए किंवा सरकारी लॅबमध्ये याची चाचणी करणे शक्य आहे.
- तसेच डायमंडवर तोंडातून वाफ सोडा, जर त्यावर वाफ साचली तर तो बनावट हिरा आहे. मात्र जर ही वाफ आर्द्रतेमध्ये बदलली तर तो हिरा खरा आहे.
- हिरा घेतल्यानंतर तो कोनातून पाहा. जर तुम्हाला इंद्रधनुष्यासारखे वेगवेगळे रंग दिसले तर तो हिरा खरा आहे.
- एखादा हिरा पाण्याच्या ग्लासमध्ये टाकला आणि तो हिरा बुडाला, तर तो खरा आहे, असे समजले जाते.मात्र जर तो तरंगायला लागला तर तो बनावट आहे, असे समजा.
- हिरा हा प्रकाशाचा एक चांगला परावर्तक आहे, त्यामुळे एक वृत्तपत्र घ्या आणि हिऱ्यामधून ते वाचण्याचा प्रयत्न करा, जर अक्षर नीट वाचता आले तर तुमचा हिरा बनावट आहे आणि पलीकडे काहीच दिसत नसल्यास तुमचा हिरा खरा आहे.