मुक्तपीठ टीम
जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचा सामना हा प्रत्येकालाच करावा लागत आहे. कुठेना कुठे या सर्वाला कारणीभूतही मानवच आहे. भारतातही हवामानात झालेला बिघड पाहायला मिळतो. या वर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यांत देशभरात मुसळधार ते अतिशय मुसळधार आणि अत्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली. ज्यामध्ये आसामला सर्वाधिक फटका बसला. विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात झाडं तोडण्यात आली. यामुळे जमिनीच्या तापमानात वाढ झाली. २०१५ ते २०२२ या ८ वर्षांतील तापमान सर्वात उष्ण असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हवामान बदलाच्या परिणामांमुळे भारतातील जवळपास निम्म्या लोकसंख्येचे जीवनमान खालावलेले असू शकते.
जागतिक हवामान संघटनेचा हवामानातील असंतुलनाचा अहवाल!
- जागतिक हवामान संघटना अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, २०२२ मध्ये जागतिक सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक च्या सरासरीपेक्षा १.१५ अंश सेल्सिअस जास्त असेल.
- समुद्र पातळी वाढीचा दर १९९३ पासून दुप्पट झाला आहे आणि जानेवारी २०२० पासून सुमारे १० मिलीमीटरने वाढून या वर्षी नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे.
ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम भारत आणि पाकिस्तानमध्ये…
- जागतिक तापमानवाढीचा परिणाम भारत आणि पाकिस्तानमध्ये दिसून येत आहे.
- मार्च आणि एप्रिल हे पाकिस्तानमध्ये सर्वाधिक उष्ण होते.
- जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.
- भारतानेही पावसाळ्यात, विशेषत: जूनमध्ये ईशान्य भागात पूर अनुभवला.
ग्लोबल वॉर्मिंगचा होणारा परिणाम
- ग्लोबल वॉर्मिंगचे सर्वात मोठे कारण म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जनात वाढ. त्यामुळे हवा गरम होत असून, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे.
- ओझोनला छिद्र पडले, यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढले या सर्वाचा परिणाम देशातील जलस्त्रोत, शेती, पर्यावरण आणि हवामानावर झाला.
- यामुळे चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनासारख्या घटना वाढत आहेत.
- कमालीचा उष्मा वाढल्याने दुष्काळाचा धोकाही वाढत आहे. . जंगलात आगीसारख्या घटना वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम अलीकडच्या काळात भारत, पाकिस्तान तसेच ब्रिटनमध्ये दिसून येत आहे.
तीव्र उष्णता असलेल्या वर्षांत २०२२चीही नोंद!
- २०२२ मध्ये आतापर्यंतचे जागतिक सरासरी तापमान १८५०-१९०० च्या सरासरीपेक्षा १.१५ अंश सेल्सिअस जास्त आहे.
- जर असेच वर्षाच्या अखेरीपर्यंत चालू राहिले, तर २०२२ हे रेकॉर्डवर पाचवे किंवा सहावे सर्वात उष्ण वर्ष म्हणून रँक केले जाईल.
- २०१५ ते २०२२ रेकॉर्डवरील आठ सर्वात उष्ण वर्षे असण्याची अपेक्षा आहे.