मुक्तपीठ टीम
प्लास्टिक वापरावर बंदी असूनही आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर हा सहज होतो. मग ते सुपर मार्केटमध्ये कोणतीही वस्तू विकत घेणे असो किंवा पाण्याची बाटली असो, जिथे बघाव तिथं प्लासिटकचा वापर होतो. ज्या प्लास्टिकच्या बाटलीतून आपण पाणी पीतो ती बॉटलसुद्धा विषारी आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिण्यापूर्वी बाटलीच्या तळाचा ‘हा’ नंबर नक्की तपासा.
प्रत्येक प्लास्टिकच्या बाटलीच्या तळाशी एक वेगळा नंबर लिहिलेला असतो आणि एक वेगळा मार्कर असतो, जो ही बाटली वापरण्यासाठी सुरक्षित आहे की, नाही हे सांगतो. प्लास्टिक किंवा PET बाटलीच्या तळाशी असलेले नंबर आणि मार्करबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
या बाटलीमधून पाणी पिणे सुरक्षित…
- पाणी पिण्यासाठी बाटली विकत घ्यायला जाल तेव्हा तिच्या खाली लिहिलेला नंबर आणि मार्कर नक्की तपासा.
- बाटलीच्या तळाशी २, ४ किंवा ५ लिहिलेले दिसले तर ती बाटली खरेदी करा.
- ही बाटली पाणी साठवण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
- कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीखाली एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉलिथिलीन), एलडीपीई (लो डेन्सिटी पॉलीथिलीन) आणि पीपी (पॉलीप्रॉपिलीन) लिहिलेले दिसले तर ती विकत घ्या.
- या प्रकारची बाटली पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
या बॉटलीमधून पाणी पिताना ही काळजी घ्या…
- बाटलीच्या तळाशी १ किंवा ७ क्रमांक लिहिलेला दिसला तर ती बाटली वापरू शकता.
- पण, या बाटलीचा वापर अतिशय विचारपूर्वक करा.
- अशी बाटली पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित नाहीत.
- अशा प्रकारच्या प्लास्टिकचा वापर शीतपेयाची बाटली, अन्न साठवण जार, कापडी तंतू आणि माउथवॉशची बाटलीसाठी केला जातो.
- एवढेच नाही तर बाटलीच्या तळाशी एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉलिथिलीन), एलडीपीई (लो डेन्सिटी पॉलीथिलीन) आणि पीपी (पॉलीप्रॉपिलीन) लिहिलेले असले तरी त्यांचा वापर टाळा.
चुकूनही ही बाटली वापरू नका
- प्लास्टिकच्या बाटलीच्या तळाशी ३ किंवा ६ नंबर लिहिलेला दिसेल तेव्हा चुकूनही ती विकत घेऊ नका.
- ही बाटली सर्वात हानिकारक आहे.
- या प्रकारच्या प्लास्टिकचा वापर प्रामुख्याने पाईप्स, क्लिनर बाटल्या, स्वयंपाकाच्या तेलाची बाटली आणि शॉवरचे पडदे बनवण्यासाठी केला जातो.
- प्लास्टिकच्या बाटलीच्या तळाशी पीव्हीसी (Polyvinyl Chloride) आणि पीएस (Polystyrene) लिहिलेले दिसले तर ती बाटली विकत घेऊ नका.
- याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
प्लास्टिक ऐवजी याचा वापर करा…
- प्लास्टिकच्या बाटलीऐवजी स्टील किंवा तांब्याची बाटली वापरा.
- अशी बाटली आरोग्यालाही हानी पोहोचवत नाहीत.
- तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.