मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या २ वर्षानंतर यावर्षी सर्व सण अगदी जल्लोषात साजरे करण्यात आले. लोकांचा उत्साह गगनात मावेनासा होता. अनेकांनी २ वर्षांची कमतरता भरून काढत जबरदस्त खरेदी केलेली आहे. या काळात कारची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. ऑक्टोबरमध्ये लाखो लोकांनी वाहनांची खरेदी केली.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या वाहन उत्पादकांच्या संघटनेने सांगितले की, “सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने ही वाढ झाली आहे. देशात प्रवासी वाहनांची विक्री २९ टक्क्यांनी वाढून २ लाख ९१ हजार ११३ युनिट झाली आहे.”
वाहनांच्या विक्रीत झालेल्या वाढीबाबत सविस्तर माहिती
- सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष विनोद अग्रवाल म्हणाले, सणांच्या काळात मागणी वाढल्याने ऑक्टोबरमध्ये विक्रीही चांगली झाली.
- उच्च महागाई आणि व्याजदरातील वाढ ग्रामीण बाजारपेठेवर अधिक परिणाम करते, त्यामुळे दुचाकी श्रेणीतील वाढ माफक होती.
- गेल्या महिन्यात तीनचाकी वाहनांची विक्री ५४ हजार १५४ युनिट्सपर्यंत वाढली.
- प्रवासी वाहने, तीनचाकी आणि दुचाकींची एकूण विक्री गेल्या महिन्यात १९ लाख 23 हजार ३२ वाहने होती, जी ऑक्टोबर २०२१ च्या १८ लाख १० हजार ८५६ युनिट्सपेक्षा सहा टक्क्यांनी जास्त आहे.