मुक्तपीठ टीम
एक मार्च पासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. मुंबई महानगरपालिकेमार्फत ६० वर्षांवरील सर्व, तसेच ४५ वर्षांवरील सहविकार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. पालिकेने या मोहिमेच्या तिसर्या टप्प्यासाठी पाच लसीकरण केंद्रे आणि तीन खासगी रुग्णालये ठरवली आहेत आहेत परंतु कोविन अॅपवरील नोंदणीत त्रुटी असल्यामुळे लोकांनी नावे नोंदवावीक परंत लस घेण्यासाठी जाण्यास घाई करू नये असे आवाहन केले आहे.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले की, “केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. नागरिक स्वतःची स्वत: नोंदणी करू शकतात, परंतु कोविन पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत लसीकरणासाठी गर्दी करू नये अशी विनंती आहे.”
या टप्प्यातील लसीकर सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्येही राबविले जाईल. सार्वजनिक आरोग्य योजना तसेच केंद्र किंवा राज्य सरकारच्या आरोग्य विमा योजना राबविणार्या खासगी रुग्णालयांना लसीकरण कार्यक्रमामध्ये समाविष्ट केले जात आहे. सदर रुग्णालयांमध्ये शासकीय नियमांनुसार पुरेशी जागा, मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणारे संभाव्य विपरीत परिणाम, व्यवस्थापन इत्यादींसाठी सुविधा उपलब्धता या बाबींचे सर्वेक्षण करुन लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येईल. त्यानंतर टप्या टप्याने सदर केंद्रांमध्ये लसीकरण सुरु करण्यात येत आहे.
बारा खाजगी रुग्णालयांनाही लसीकरणात सहभागी करण्यात आले आहे. तेथे त्यांचे कर्मचारीच लस घेऊ शकतील. ही रुग्णालये इतर आरोग्य आणि कोरोना योद्ध्या कर्मचार्यांना लस देऊ शकतात की नाही याचा निर्णय राज्य सरकारच्या धोरणाच्या आधारे घेतला जाण्याची शक्यता आहे.