मुक्तपीठ टीम
स्मार्टफोनच्या जगात सॅमसंगने फोल्डेबल फोन लाँच केला, नंतर इतर कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल फोन लाँच केले. परंतु अॅपलने फोल्डेबल आयफोन अजून बाजारात आणले नाहीत. त्यामुळे सॅमसंगने अॅपलवरवर जोरदार टोलेबाजी केली आहे. सॅमसंग अॅपलला प्रतिस्पर्धी मानते आणि जाहिरातींमध्ये आयफोन फिचर्सची तुलना त्याच्या मॅडलच्या फिचर्सशी करते.
- सॅमसंगने ‘ऑन द फेंस’ नावाची एक जाहिरात व्हिडिओ शेअर केली आहे.
- यात अॅपल डिव्हाइसचे खरेदीदार सॅमसंग फोनच्या नवीन फिचर्सची वाट पाहत असल्याचे दिसत आहेत.
- व्हिडिओमध्ये एक तरुण अॅपल रिटेल स्टोअरजवळ भिंतीवर बसलेला दिसतो आणि इतरांनी त्याला असे न करण्याचा सल्ला देत, अॅपलकडे बघताना दिसत आहे.
व्हिडिओच्या माध्यामातून आयफोन युजर्सना टोला!!
- व्हिडिओत एक अॅपल वापरकर्ता सॅमसंगने दिलेल्या फीचर्सचा शोध घेत आहे.
- अॅपलचा एक कर्मचारी तसे करण्यास नकार देत आहे.
- बाहेर बसलेल्या युर्जसचे म्हणतो की सॅमसंगकडे फोल्डेबल फोन आणि उत्तम कॅमेरा फोन आहे.
- अॅपल कर्मचारी त्यावर उत्तर देतो, “थांबा, तोही इथे येईल.”
- बाहेर बसलेल्या युजरला हे करायचे नाही, परंतु प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जातो.
सॅमसंगकडे सर्वाधिक फोल्डेबल फोन
- सॅमसंगकडे फोल्डेबल उपकरणांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे.
- अॅपल फोल्डेबल डिझाइनसह प्रोटोटाइपवर काम करत आहे.
- फोल्डेबल आयफोन बाजारात येण्याबाबत कंपनीने काहीही उघड केलेले नाही.