मुक्तपीठ टीम
काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपची सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती. आता सर्व्हर साइड प्रॉब्लेममुळे इंस्टाग्रामवर अनेकांचे अकाऊंट आपोआप सस्पेंड होत आहेत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इंस्टाग्रामच्या बातम्या येत आहेत. सोशल नेटवर्किंग अॅप इन्स्टाग्रामच्या यूजर्सना अकाउंट ऍक्सेस करण्यात अडचणी येत आहेत. मेटाने हे मान्य केले आहे की ही सर्व्हर साइड प्रॉब्लेम आहे. कंपनी या प्रकरणाची चौकशी करत आहे.
जाणून घ्या युजर्सना काय समस्या येत आहेत
- इंस्टाग्राम लॉग इन केल्यावर, खाते निलंबनाची सूचना दिसते.
- अनेक यूजर्स सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत आहेत.
- अशा परिस्थितीत इंस्टाग्राम खरेच युजर्सचे अकाउंट सस्पेंड करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
इंस्टाग्रामच्या कम्युनिकेशन टीमचे ट्विट…
- इंस्टाग्रामच्या कम्युनिकेशन टीमने ट्विट करत माहिती दिली आहे की युजर्सना इंस्टाग्राम अकाउंट ऍक्सेस करण्यात अडचण येत आहे.
- त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- त्रास दिल्याबद्दल क्षमस्व.
- एका यूजरने लिहिले की, इंस्टाग्रामवर काय चालले आहे?
- माझे अकाउंट कोणतेही कारण नसताना सस्पेंड करण्यात आले.
- जेव्हा मी कोड सत्यापित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते एर्र दर्शवत आहे.
- इतर कोणाला हीच समस्या आहे का?