मुक्तपीठ टीम
टेस्लाच्या एलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ ताब्यात घेताच सीईओ आणि कायदा विभागाच्या प्रमुखांना काढून टाकले. नोकरकपातीची चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर ट्विटर मुख्यालयाबाहेर एक वेगळंच नाट्य रंगलं. तिथं काही जण ट्विटरने काढलेले आयटी इंजिनीअर असल्याचं भासवत माध्यमांशी बोलले. प्रत्यक्षात ते कॉमेडियन होते. त्यांनी जागतिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे ‘पोपट’ केले…
मस्कही विनोदात सामील…
- ट्विटर कर्मचार्यांना काढून टाकल्याच्या बातमीनंतर, काही कॉमेडियन ट्विटरच्या मुख्यालयात पोहोचले.
- ट्विटर घडामोडींचे कव्हरेज करण्यासाठी अनेक माध्यम समूहांचे प्रतिनिधी ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयात पोहोचले होते.
- त्याच संधीचा फायदा घेण्यासाठी काही ते विनोदवीर तेथे पोहोचले होते.
- मस्कच्या अधिग्रहणानंतर कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
- याचे छायाचित्रे सोशल मीडियावर पोहोचताच मस्कही एन्जॉय करण्यासाठी तेथे पोहोचले.
- वास्तविक मस्क हा व्हिडिओ पाहत होते ज्यामध्ये एकजण त्यांचे नाव राहुल लिग्मा सांगत होता.
- अनेक बड्या मीडिया हाऊसच्या पत्रकारांचीही फसवणूक झाली.
- CNBCचे वरिष्ठ पत्रकार डेइड्रा बोसा यांनी ट्वीट केले की डेटा इंजिनीअरिंग टीमला काढून टाकण्यात आले आहे.
- या गोंधळादरम्यान ट्विटरच्या एका कर्मचाऱ्याने स्पष्टीकरण देण्यासाठी पुढाकार घेतला.
- पॉल ली नावाच्या प्रोडक्ट मॅनेजरने हा सगळा विनोद असल्याची माहिती दिली.
ट्विटर आता समंजसांच्या हातात – डोनाल्ड ट्रम्प
- ट्विटरच्या अधिग्रहणानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर करण्याबाबत चर्चा सुरू आहे.
- गेमिंग आणि ट्रोलिंग युजर्सचे खाते The Alt GMRv ने त्याचे नाव बदलून डोनाल्ड जे. ट्रम्प ठेवले आहे.
- यामुळे ट्रम्प यांनी ट्विटरवर पुनरागमन केल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल पोस्टवर म्हणाले की, ट्विटर आता शहाण्यांच्या हातात आहे याचा मला खूप आनंद आहे. आता ते रॅडिकल लेफ्ट लुनॅटिक्स चालवणार नाहीत, जे आपल्या देशाचा खरोखर द्वेष करतात. ते पुन्हा ट्विटरवर सक्रिय होणार की नाही हे स्पष्ट केले नाही. २०२१ मध्ये अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचावर बंदी घातली होती.
हेही वाचा:
एलॉन मस्कच्या ताब्यातील ‘ट्विटर’विरोधात नवे ‘ब्ल्यू स्काय’ अॅप! ट्विटरच्या संस्थापकांचं नवं पाऊल…
एलॉन मस्कच्या ताब्यातील ‘ट्विटर’विरोधात नवे ‘ब्ल्यू स्काय’ अॅप! ट्विटरच्या संस्थापकांचं नवं पाऊल…