मुक्तपीठ टीम
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किशोरी पेडणेकर यांच्या कथित एसआरए घोटाळा प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एसआरए घोटाळाप्रकरणी दादर पोलिसांनी शुक्रवारी चौकशी केली. तसेच शनिवारी पुन्हा चौकशीला बोलावलं होतं मात्र आपण चौकशीसाठी जाणार नाही असं पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलं आहे. दरमयान किरीट सोमय्या हे संजय राऊतांनंतर मला टार्गेट करत आहेत असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
- किरीट सोमय्या दरवेळी प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.
- या प्रकरणाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे.
- या प्रकरणाशी संबंध असलेल्या विभागानेही यामध्ये माझा संबंध नसल्याचे लिहून दिलेले आहे.
- पण तरीदेखील मी सीईओ, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, असं सोमय्या म्हणत आहेत.
- दबावतंत्राने आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे.
- सोमय्या हे एकाच गोष्टीला घेऊन वारंवार आरोप करत आहेत.
- विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- ज्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला गेला, ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले.
- हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही.
माझ्या आयुष्याचे पुस्तक उघडे!!!
- मी मागील कित्येक वर्षांपासून वरळी विधानसभेतच राहते.
- माझ्या आयुष्याचे पुस्तक उघडे आहे.
- माझं सासर आणि माहेर हे वरळी विधानसभा मतदारसंघातच आहे.
- मी गोमातानगरमध्ये २०१७ साली फॉर्म भरला होता.
- तेव्हा मी केअर ऑफ म्हणून हा फॉर्म भरलेला होता.
- पण कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही.