मुक्तपीठ टीम
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वाद मिळेल आणि आपली अर्थव्यवस्था रुळावर येईल,असे केजरवाल यांनी सांगितले. दरम्यान केजरीवाल यांनी ही मागणी करताना मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाच्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो असू शकतो, मग इथे का नाही? असा उल्लेख केला आहे. पण इंडोनेशियाच्या नोटांवर का आधीपासूनच गणपती बाप्पा विराजमान आहेत? जाणून घ्या…
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
- अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मागणीमागे सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाचे उदाहरण दिले.
- ते म्हणाले, “इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे.
- येथे ८५% मुस्लिम आणि फक्त २% हिंदू आहेत पण तिथल्या चलनावर गणपती बाप्पाचा फोटो आहे.
- मी पंतप्रधानांना आवाहन करतो की, नव्याने छापलेल्या नोटांवरही माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचा फोटो छापण्यात यावा.
- भारताच्या चलनाला रुपया म्हणतात तर इंडोनेशियाच्या चलनाला रुपिया म्हणतात.
- इंडोनेशियातील २० हजारांच्या नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो छापण्यात आला आहे.
- या नोटेच्या एका बाजूला गणपती बाप्पाचा फोटो तर दुसऱ्या बाजूला वर्गाचा फोटो आला असून, त्यात शिक्षक आणि विद्यार्थी आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार, नोटेवर ज्या शिक्षकाचे फोटो छापले आहे ते इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांतराचे आहे.
गणपती बाप्पा हा ज्ञान, कला, विज्ञानाचा देव!!
- असे म्हटले जाते की इंडोनेशियाचा काही भाग एकेकाळी चोल राजवटीत होता.
- चोल राजवटीच्या काळात येथे अनेक मंदिरे बांधली गेली.
- गणपती बाप्पाला ज्ञान, कला आणि विज्ञानाचा देवता मानले जात असे.
- चलनी नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो छापण्याचे हे एक कारण असू शकते.