Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान ऋषि सुनक ब्रिटिशांसारखेच वागले! भारताविरुद्ध बोलणाऱ्या सुएला ब्रेव्हरमनना महत्वाचं खातं!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Home Secretary Of UK

मुक्तपीठ टीम

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी निवड झाली. ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदावर विराजमान होताच अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, तर काहींना मंत्रिमंडळात स्थानही दिलं आहे. त्यापैकीच त्यांच्या मंत्रिमंडळात सुएला ब्रेव्हरमन, ज्या लिझ सरकारमध्ये गृहमंत्री होत्या, त्या परतल्या आहेत. त्यांची पुन्हा गृहमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतासोबत मुक्त व्यापार करार झाल्यास ब्रिटनमध्ये स्थलांतरितांची संख्या वाढेल, असे सुएला ब्रेव्हरमन यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

ब्रेव्हरमन यांनी भारताबद्दल काय वादग्रस्त वक्तव्य केलं?

  • ब्रेव्हरमन यांनी स्पेक्टॅटर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारताबरोबर व्यापारी करार केल्याने ब्रिटनमध्ये होणारं स्थलांतरण वाढेल.
  • आधीच ब्रिटनमध्ये भारतातून आलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे.
  • भारताबरोबर मुक्त स्थलांतरण धोरण ठरवण्याविषयी मला काळजी वाटते.
  • कारण ब्रेक्झिट होताना लोकांनी त्यासाठी मतदान केलेलं नाही.
  • विद्यार्थी आणि उद्योजकांना सवलत देण्याविषयी माझं वेगळं मत आहे.
  • ब्रिटनमधील स्थलांतरितांची संख्याही लक्षात घेतली पाहिजे.
  • ब्रिटनमध्ये मुदतीपेक्षा अधिक राहणाऱ्यांमध्ये भारतीय स्थलांतरितांची संख्या सर्वाधिक आहे.
  • अधिक चांगल्या सहकार्यासाटी मागील वर्षी याबाबत भारत सरकारबरोबर एक करारही करण्यात आला.
  • मात्र, त्याचा आवश्यक परिणाम होताना दिसत नाही.

सुएला यांना का द्यावा लागला राजीनामा?

  • सुएला ब्रेव्हरमनवर सरकारी कागदपत्रे एका खासदाराला ईमेलद्वारे पाठवल्याचा आरोप होता.
  • त्यांच्यावर गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप होता.
  • यानंतर ब्रेव्हरमन यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला.
  • मात्र, त्यानंतरही ट्रस सरकार चालू शकले नाही. लिझ ट्रस यांनी आपले अपयश स्वीकारले आणि राजीनामा सादर केला.

कोण आहेत सुएला ब्रेव्हरमन?

  • सुएला या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहे.
  • त्यांचे वडील क्रिस्टी फर्नांडिस मूळचे गोव्याचे असले तरी आई उमा तमिळ हिंदू कुटुंबातील होत्या.
  • मात्र १९६० मध्ये त्या ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्या.
  • सुएलाचा जन्म लंडनमध्येच झाला होता.
  • त्या ब्रिटिश नागरिक आहे.
  • लिझ सरकारमध्ये ४३ दिवस गृहमंत्री राहिलेल्या सुएला यांनी २० ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला.

Tags: Home SecretaryRishi SunakSuella BravermanUKपंतप्रधान ऋषि सुनकब्रिटनसुएला ब्रेव्हरमन
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिवाळी: ‘वर्षा’वर शेतकऱ्यांसोबत, भामरागडमध्ये आदिवासींसोबत!

Next Post

आपच्या केजरीवालांनी आता मागणी केली, पण इंडोनेशियाच्या नोटांवर का आधीपासूनच गणपती बाप्पा विराजमान? जाणून घ्या…

Next Post
indonesia currency

आपच्या केजरीवालांनी आता मागणी केली, पण इंडोनेशियाच्या नोटांवर का आधीपासूनच गणपती बाप्पा विराजमान? जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!