मुक्तपीठ टीम
जियो आपली 5G सेवा देशभरात विस्तारत आहे. कंपनीने जियो ट्रू 5Gनंतर जियो ट्रू 5G चालित वाय-फाय सेवा सुरू केली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही सेवा जियो ट्रू 5G नेटवर्कवर काम करेल. त्याचा लाभ शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, बसस्थानक इत्यादी ठिकाणी मिळणार आहे.
ज्या ठिकाणी यूजर्सची संख्या नेहमीपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी ही सेवा थेट सुरू केली जाईल. चांगली गोष्ट म्हणजे जियो यूजर्सना जियो वेलकम ऑफर अंतर्गत नवीन वाय-फाय सेवा मोफत मिळणार आहे. जियो ट्रू 5G समर्थित वाय-फाय राजस्थानमधील नाथद्वारा या पवित्र शहरातून लॉंच करण्यात आले.
जियो यूजर्सना जियो वेलकम ऑफर अंतर्गत वाय-फाय सेवा मोफत!
- जियो यूजर्सना जियो वेलकम ऑफर कालावधीत ही नवीन वाय-फाय सेवा मोफत मिळेल.
- इतर नेटवर्क वापरणारे देखील जियो 5G समर्थित वाय-फायचा मर्यादित वापर करू शकतील.
- पण जर त्यांना जियो 5Gवर चालणाऱ्या वाय-फायची पूर्ण सेवा वापरायची असेल, तर त्यांना जियोचे ग्राहक बनावे लागेल.
- विशेष म्हणजे जियो ट्रू 5G वाय-फायशी कनेक्ट होण्यासाठी ग्राहकाकडे 5G हँडसेट असणे आवश्यक नाही. तो 4G हँडसेटवरूनही या सेवेशी कनेक्ट होऊ शकतो.
‘JioTrue5G’ समर्थित सेवा असणारी राज्ये-शहरे कोणती?
- JioTrue5G समर्थित सेवेसोबत, जियोची ट्रू 5G सेवा राजस्थानच्या नाथद्वारा आणि चेन्नई येथे सुरू झाली आहे. . अलीकडेच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथेही 5G सेवा सुरू करण्यात आली.
- इतर शहरांमध्ये लवकरच जियो 5G सेवा सुरू करण्यासाठी आणि ट्रू 5G हँडसेटची उपलब्धता वाढवण्यासाठी जियो टीम चोवीस तास काम करत आहेत.
- नाथद्वारा हे राजस्थानमधील पहिले शहर आहे जेथे ऑपरेटरने 5G सेवा सुरू केली आहे.