मुक्तपीठ टीम
मूनलाइटिंगबाबत कडक भुमीका घेणाऱ्या आयटी कंपन्या आता या मुद्द्यावर काहीशी उदार भूमिका घेत आहेत. एक किंवा अधिक कंपन्यांमध्ये एकाच वेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांना एकाचवेळी दोन्ही ठिकाणी काम करता येणार आहे. इन्फोसिससने तसे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
मूनलाइटिंग योग्य की अयोग्य याबाबत आयटी उद्योगात वाद सुरू आहे, परंतू आता भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना इतरत्र काम करण्याची परवानगी देण्याचे संकेत दिले आहेत. इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी तिमाही निकाल जाहीर करताना ही माहिती दिली.
अशी आहे कंपनीची नवी पॉलिसी…
- त्रैमासिक निकाल जाहीर करताना इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख म्हणाले, “आम्ही कर्मचार्यांच्या कामानंतर इतर गोष्टी शिकण्याच्या आणि करण्याच्या महत्त्वाकांक्षेचा आदर करतो.
- कंपनी अशा पॉलिसीवर काम करत आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना इतर कंपन्यांचे छोटे काम करण्यासाठी सूट मिळू शकते.
- यासाठी आगाऊ परवानगी घेणे आवश्यक आहे.
- पॉलिसी बनवताना, कर्मचारी कराराच्या अटी आणि गोपनीयतेचा पूर्णपणे आदर करतात याची खात्री करणार.