मुक्तपीठ टीम
सांगली जिल्ह्यातील भाजपाच्या निष्ठावंत गटातील २०० कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालण्याचा निर्णय सांगली येथे पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा अथवा प्रदेश कार्यकरणी व पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकरची विचारपूस केली जात नसल्याने भाजपाचे निष्ठावंत नाराज आहेत.
भाजपाचे निष्ठावंत नाराज!!
- सांगली जिल्ह्यातल्या निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात गेल्या काही महिन्यांपासून खदखद सुरू आहे.
- पक्षामध्ये नव्याने दाखल झालेल्यांना मान आणि मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांनी डावलण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
- सांगलीमध्ये जिल्ह्यातल्या निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांची लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात बैठक पार पडली.
- सांगलीतील २०० कार्यकर्त्यांसह मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलनाचा निर्णय घेतला.
- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालून जोरदार निदर्शने करण्याचा इशाराही या बैठकीदरम्यान देण्यात आला.
- सांगली जिल्ह्यात येणाऱ्या प्रदेशच्या पदाधिकार्यांसह मंत्र्यांनाही काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.
- त्या अगोदर शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्यांचे निवेदन प्रदेश कार्यकारणीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर निदर्शन करणार-
- या बैठकीत अनेकांनी व्यथा मांडल्या.
- भाजपाचं जिल्हा नेतृत्त्व आणि प्रदेश नेतृत्त्व कृतघ्नता दाखवत आहे.
- त्याविरुद्ध आम्ही मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर निदर्शन करुन आणि बावनकुळे यांना घेराव घालणार आहोत, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
- आयारामांचं स्वागत आहे पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उपहास, कृतघ्नता खपवून घेणार नाही.
- सदर बैठकीस प्रताप पाटील, प्रदीप वाले,डॉ. योगेश लाड, विनायक खरमाटे ,अॅडव्होकेट श्रीपाद अष्टेकर,भारत निकम, संजय हिरेकर,संजय कोरे, भगवान पाटील,सुरेश कोरे आदी निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.