मुक्तपीठ टीम
मोड आलेले धान्य खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले चणे खाण्याचे आरोग्याला काय फायदे आहेत? याच्या सेवनाने शरीर मजबूत होते आणि अनेक आजारांपासून बचावही होतो. मोड आलेले चणे आणि मूग खाल्ल्याने शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कायम राहते. तसेच स्नायू मजबूत होतात. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्व आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तणावही दूर होतो.
आजकाल लोकांना फास्ट फूड खाण्याची खूप आवड निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जे आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करतात त्यांना स्वतःला निरोगी ठेवायचे असेल, तर त्यांनी दररोज रिकाम्या पोटी मोड आलेले चणे, मूग इत्यादींचे सेवन करावे.
मोड आलेले चणे रोज का खावे?
- मोड आलेले हरभरे खाल्ल्याने शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढते.
- आळस आणि थकवा टाळण्यासाठी आणि नेहमी उत्साही राहण्यासाठी चणे रोज खावेत.
- काही दिवसातच तुम्हाला ताजेपणा, ऊर्जा जाणवेल.
- मोड आलेले हरभरे किंवा मूग डेली खाल्याने लघवीची समस्या असल्यास अंकुरलेले हरभरे किंवा मूग रोज सेवन करावे. यामुळे अनेक फायदे होतात.
- यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
- मानसिक तणावातून जात असलेल्या लोकांसाठी देखील हे फायदेशीर आहे.
मोड आलेले मूग सलाडमध्ये मिसळून खा
- मोड आलेले चणे किंवा मूग खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात.
- ते सलाड म्हणून खाऊ शकता किंवा सलाडमध्ये मिसळून खाऊ शकतो.
- यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तणावही दूर होतो.
- मोड आलेले चणे किंवा मूग खाल्ल्यास लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त आढळते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते.