Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यत्र-तत्र-सर्वत्र GST: रोटीवर ५ टक्के तर पराठ्यांवर १८ टक्के कर!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Paratha and roti

मुक्तपीठ टीम

तुम्ही पराठे खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला आता त्यावर १८ टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे. तर रोटीवर ५ टक्के जीएसटी मोजावे लागणार आहे. अहमदाबादमधील वाडीलाल इंडस्ट्रीजने दाखल केलेल्या अपीलवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या मते, चपाती आणि पराठ्यामध्ये खूर फरक आहे. पराठ्यामध्ये भाज्यांचा वापर केला जातो त्यामुळे त्याची किंमत चपातीच्या तुलनेत जास्त आकारण्यात येईल. त्यामुळे आता गुजरातमध्ये पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी असणार आहे. वाडीलाल इंडस्ट्रीजने ही कंपनी अनेक प्रकारचे रेडी टू कूक म्हणजेच फ्रोजन पराठे बनवते.

एएएआरने कंपनीचा युक्तिवाद फेटाळला…

  • अहमदाबादमधील वाडीलाल इंडस्ट्रीज या कंपनीने पराठ्यावरील जीएसटी कमी करण्याची याचिका कोर्टात दाखल केली होती.
  • रोटी आणि पराठामध्ये फारसा फरक नाही, असा युक्तिवाद कंपनीने केला.
  • दोन्ही पिठापासून बनवलेले असतात, त्यामुळे पराठ्यावरही ५ टक्के जीएसटी असावा.
  • एएएआरने कंपनीचा हा युक्तिवाद फेटाळून लावत पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी लागेल असं स्पष्ट केलं.

पराठे रोटीच्या श्रेणीत येतात…

  • याचिकाकर्त्यानी युक्तीवाद केला की, त्यांची कंपनी ८ प्रकारचे फ्रोझन पराठे बनवते. ज्यात मलबार पराठा, मिक्स पराठा, व्हेज पराठा, कांदा पराठा, प्लेन पराठा, आलू पराठा, लच्छा पराठा यांचा समावेश आहे.
  • यामध्ये प्रामुख्याने गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो.
  • हे पराठे रोटीच्या श्रेणीत येतात.
  • कारण त्यात फक्त पीठ, तेल, भाजीपाला कच्चा माल म्हणून वापरला जातो.
  • त्यामुळे यावर कोणताही एसजीएसटी किंवा सीजीएसटी लावू नये.

रोटी आणि पराठा यांच्यात मोठा फरक: एएएआर

  • एएएआरने म्हटले आहे की अपीलकर्त्याद्वारे पुरवले जाणारे पराठे रोटीपेक्षा वेगळे आहेत.
  • साध्या रोटीच्या श्रेणीत याचा विचार केला जाऊ शकत नाही, ज्याला GAAR (सामान्य अँटी-अव्हॉइडन्स नियम) द्वारे देखील समर्थन दिले गेले आहे.
  • GAAR ने गुजरातच्या अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंगच्या जून २०२१ च्या आदेशाचे प्रभावीपणे समर्थन केले आहे, ज्यात असे म्हटले होते की असे पॅकेज केलेले पराठे दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत ३-४ मिनिटे शिजवले जाणे आवश्यक आहे आणि रोटी आणि पराठ्यात फरक आहे.

Tags: GSTParathaRotiजीएसटीपराठारोटी
Previous Post

अंधेरीत कोण बाजी मारणार? दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल

Next Post

रिकाम्या पोटी मोड आलेले मूग आणि चणे का खावे? जाणून घ्या आरोग्याचे लाभ…

Next Post
sprouted

रिकाम्या पोटी मोड आलेले मूग आणि चणे का खावे? जाणून घ्या आरोग्याचे लाभ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!