Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंच्या सेनेला सोडून माजी आमदार अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्धव सेनेला धक्का

October 14, 2022
in घडलं-बिघडलं
0
Join BJP

मुक्तपीठ टीम

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उद्धव ठाकरे शिवसेनेचे युवा नेते व श्रीवर्धनचे माजी आमदार अवधूत तटकरे तसेच मीरा भाईंदरच्या तीन नगरसेवकांनी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेला धक्का बसला. मीरा भाईंदरमधील एका काँग्रेस नगरसेवकानेही भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री रविंद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. मीरा भाईंदर महानगरपालिकेतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक दिप्ती भट्ट, अनिता पाटील व कुसुम गुप्ता तसेच काँग्रेसचे नगरसेवक नरेश पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

अवधूत तटकरेंचा भाजपा प्रवेश म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा झटका आहे व निश्चितपणे कोकणात त्यांना रोज असे झटके बसणार आहेत, असे मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले की, युतीमध्ये भाजपाने रायगडसह कोकणात शिवसेनेला महत्त्व दिल्यामुळे भाजपाचे संघटन मजबूत झाले नव्हते. आता भाजपा स्वतंत्रपणे संघटना मजबुतीने उभी करत आहे. रायगड, पालघरसह कोकणात सर्वत्र उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल होत आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोकणात सर्वत्र भाजपा कार्यकर्ते उत्साहाने काम करत आहेत.

मा. अवधूत तटकरे यांनी रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद बारा वर्षे भूषविले होते. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले होते.


Tags: Bharatiya Janata PartyBJPFormer MLA Avadhoot TatkareMeera Bhayander Corporatormuktpeethshiv senaUddhav Senaउद्धव सेनाघडलं-बिघडलंभाजपाभारतीय जनता पार्टीमाजी आमदार अवधूत तटकरेमीरा भाईंदर नगरसेवकमुक्तपीठशिवसेना
Previous Post

रिकाम्या पोटी मोड आलेले मूग आणि चणे का खावे? जाणून घ्या आरोग्याचे लाभ…

Next Post

शिंदेंनी शिवसेनेची अंधेरी लढण्याआधीच का गमावली?

Next Post
uddhav-eknath-devendra

शिंदेंनी शिवसेनेची अंधेरी लढण्याआधीच का गमावली?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!