मुक्तपीठ टीम
माहिती आणि प्रसारण खात्याच्या आदेशानंतर झी मीडियाच्या ९ न्यूज चॅनल्सचे फ्री डिशवरील प्रसारण बंद झाले. त्यामुळे त्यांच्या मार्केट शेअरवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण त्याआधीच या समुहाने बार्कच्या प्रेक्षक मोजणीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तसं करताना झी मीडियाने कारण दिलं आहे ते लँडिंग पेजवरील मोजणीचा काही नव्या चॅनल्सला गैरफायदा मिळत असल्याचे. त्यामुळे एनडीटीव्हीनंतर आता ३९व्या आठवड्यापासून झी मीडियाच्या चॅनल्सचाही भारतातील टीव्ही रेटिंगमध्ये समावेश नाही.
झी मीडियाचा मोठा पसारा!
- झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड ZMCL हे भारतातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क आहे.
- या नेटवर्कमध्ये १० वेगवेगळ्या भाषेंचे न्यूज चॅनल्स आहेत.
- त्यांचे १८३ दशलक्षाहून अधिक प्रेक्षक आहेत.
- हा समूह १४ टीव्ही न्यूज चॅनेलची मालकी आणि संचालन करते.
- ज्यात १ ग्लोबल, ४ राष्ट्रीय आणि ९ प्रादेशिक भाषा चॅनेल आहेत.
- कंपनीकडे ५ डिजिटल चॅनेल आणि १७ डिजिटल ब्रँड आहेत.
- कंपनीकडे पॅन इंडियाच्या उपस्थितीसह न्यूज ब्युरो आणि संवादकांचे सर्वात मोठे नेटवर्क आहे.
- कंपनी सामग्री निर्मिती, पॅकेजिंग आणि ब्रॉडकास्टिंगमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
व्ह्यूअरशिप मोजण्याचा कालावधी २ मिनिटांपर्यंत वाढवण्याची ZMCLची मागणी
- ZMCLने स्पष्ट केले की ते सातत्याने बीएआरसी इंडियाला लँडिंग पेजच्या समस्येवर सुधारात्मक उपाययोजना करण्याची विनंती करत आहे
- परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
- लँडिंग पेजचा डेटा अंतिम व्ह्यूअरशिपमध्ये समाविष्ट करू नये, अशी त्यांची मागणी आहे.
- व्ह्यूअरशिप मोजण्याचा कालावधी २ मिनिटांपर्यंत वाढवावी, अशी मागणी ZMCL केली आहे.
- कंपनीने त्यांनी प्रेक्षक मोजणी व्यवस्थेतून निर्णय बीएआरसीला पत्र लिहित केला आहे.
- न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर ZMCLने बार्क सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
- झेडएमसीएलने ते बीएआरसी विरोधात नाही हे स्पष्ट केले आहे.
- चक्रवर्ती यांनी नमूद केले की लँडिंग पेजच्या समस्येवर परिषदेने एकत्र येण्याची गरज आहे.
- ते म्हणाले बीएआरसीकडे असा अल्गोरिदम असावा जो लँडिंग पेज डेटा मोजत नसेल.
लँडिंग पेजचा मुद्दा काय आहे?
- प्रेक्षकांनी रिमोटचे बटन दाबून टीव्ही सेटअप बॉक्स ऑन केल्यानंतर सर्वप्रथम जे समोर येते त्या पेजला किंवा चॅनल स्क्रिनला लँडिंग पेज म्हणतात.
- काही टीव्ही चॅनल्स अवाढव्य रक्कम भरून MSOकडून ती जागा मिळवतात.
- त्यामुळे कोणीही टीव्ही ऑन केला तरी त्यांना ती प्रेक्षक संख्या मिळते.
- याआधीही काही GEC आणि NEWS चॅनल्सनी हा मार्ग वापरत नंबर गेममध्ये बाजी मारली होती.
- त्यावर वारंवार वाद होत राहिली आहे.
- बार्कने लँडिंग पेज व्ह्यूअरशिप मोजणे थांबवण्याची मागणी होत राहिली आहे.
- किमान व्ह्यूअरशिप मोजण्यासाठी लागणारा वेळ 2 मिनिटांपर्यंत वाढवावा, अशी ZMCLची मागणी आहे.
- तसे केले तर प्रत्येक प्रेक्षकाने टीव्ही ऑन केल्यानंतर मिळणारी आयती प्रेक्षक संख्या लँडिंग पेजचा LCN नंबर मिळवणाऱ्या चॅनल्सना मिळणार नाही.
- अंतिम व्ह्यूअरशिपमधून लँडिंग पेज डेटा काढून ते एक समान स्पर्धेचे क्षेत्र बनवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
- व्ह्यूअरशिप मोजण्यासाठी कालावधी २ मिनिटांपर्यंत वाढवावा कारण ते रिअल व्ह्यूअरशिप कॅप्चर करते, या ZMCL च्या दाव्यात तथ्य आहे.
फ्री डिशवरील प्रसारण बंद आणि ZMCLचा बार्कमधून लँडिंग पेज मुद्द्यावर माघार!
- आजवर ZMCLने आपले ९ न्यूज चॅनल्स फ्री डिशवर प्रसारीत करत असे.
- पण ते योग्य नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या.
- गेली काही वर्षे होत असलेल्या तक्रारींची दखल घेत माहिती प्रसारण खात्याने ZMCLच्या चॅनल्सचे फ्री डिशवरील प्रसारण थांबवले.
- त्यामुळे बार्क रेटिंगवर परिणाम होण्याची भीती असतानाच योगायोगाने ZMCLने लँडिंग पेजचा मुद्दा उपस्थित करत बार्कमधून माघार घेतल्याचे समोर आले आहे.