Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फ्री डिशवरून बाहेर गेलेली झी मीडियाची न्यूज चॅनल्स बार्क रेटिंग स्पर्धेमधून बाहेर का? जाणून घ्या कारण…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Zee And BARC

मुक्तपीठ टीम

माहिती आणि प्रसारण खात्याच्या आदेशानंतर झी मीडियाच्या ९ न्यूज चॅनल्सचे फ्री डिशवरील प्रसारण बंद झाले. त्यामुळे त्यांच्या मार्केट शेअरवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण त्याआधीच या समुहाने बार्कच्या प्रेक्षक मोजणीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तसं करताना झी मीडियाने कारण दिलं आहे ते लँडिंग पेजवरील मोजणीचा काही नव्या चॅनल्सला गैरफायदा मिळत असल्याचे. त्यामुळे एनडीटीव्हीनंतर आता ३९व्या आठवड्यापासून झी मीडियाच्या चॅनल्सचाही भारतातील टीव्ही रेटिंगमध्ये समावेश नाही.

झी मीडियाचा मोठा पसारा!

  • झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड ZMCL हे भारतातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क आहे.
  • या नेटवर्कमध्ये १० वेगवेगळ्या भाषेंचे न्यूज चॅनल्स आहेत.
  • त्यांचे १८३ दशलक्षाहून अधिक प्रेक्षक आहेत.
  • हा समूह १४ टीव्ही न्यूज चॅनेलची मालकी आणि संचालन करते.
  • ज्यात १ ग्लोबल, ४ राष्ट्रीय आणि ९ प्रादेशिक भाषा चॅनेल आहेत.
  • कंपनीकडे ५ डिजिटल चॅनेल आणि १७ डिजिटल ब्रँड आहेत.
  • कंपनीकडे पॅन इंडियाच्या उपस्थितीसह न्यूज ब्युरो आणि संवादकांचे सर्वात मोठे नेटवर्क आहे.
  • कंपनी सामग्री निर्मिती, पॅकेजिंग आणि ब्रॉडकास्टिंगमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

व्ह्यूअरशिप मोजण्याचा कालावधी २ मिनिटांपर्यंत वाढवण्याची ZMCLची मागणी

  • ZMCLने स्पष्ट केले की ते सातत्याने बीएआरसी इंडियाला लँडिंग पेजच्या समस्येवर सुधारात्मक उपाययोजना करण्याची विनंती करत आहे
  • परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
  • लँडिंग पेजचा डेटा अंतिम व्ह्यूअरशिपमध्ये समाविष्ट करू नये, अशी त्यांची मागणी आहे.
  • व्ह्यूअरशिप मोजण्याचा कालावधी २ मिनिटांपर्यंत वाढवावी, अशी मागणी ZMCL केली आहे.
  • कंपनीने त्यांनी प्रेक्षक मोजणी व्यवस्थेतून निर्णय बीएआरसीला पत्र लिहित केला आहे.
  • न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर ZMCLने बार्क सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
  • झेडएमसीएलने ते बीएआरसी विरोधात नाही हे स्पष्ट केले आहे.
  • चक्रवर्ती यांनी नमूद केले की लँडिंग पेजच्या समस्येवर परिषदेने एकत्र येण्याची गरज आहे.
  • ते म्हणाले बीएआरसीकडे असा अल्गोरिदम असावा जो लँडिंग पेज डेटा मोजत नसेल.

लँडिंग पेजचा मुद्दा काय आहे?

  • प्रेक्षकांनी रिमोटचे बटन दाबून टीव्ही सेटअप बॉक्स ऑन केल्यानंतर सर्वप्रथम जे समोर येते त्या पेजला किंवा चॅनल स्क्रिनला लँडिंग पेज म्हणतात.
  • काही टीव्ही चॅनल्स अवाढव्य रक्कम भरून MSOकडून ती जागा मिळवतात.
  • त्यामुळे कोणीही टीव्ही ऑन केला तरी त्यांना ती प्रेक्षक संख्या मिळते.
  • याआधीही काही GEC आणि NEWS चॅनल्सनी हा मार्ग वापरत नंबर गेममध्ये बाजी मारली होती.
  • त्यावर वारंवार वाद होत राहिली आहे.
  • बार्कने लँडिंग पेज व्ह्यूअरशिप मोजणे थांबवण्याची मागणी होत राहिली आहे.
  • किमान व्ह्यूअरशिप मोजण्यासाठी लागणारा वेळ 2 मिनिटांपर्यंत वाढवावा, अशी ZMCLची मागणी आहे.
  • तसे केले तर प्रत्येक प्रेक्षकाने टीव्ही ऑन केल्यानंतर मिळणारी आयती प्रेक्षक संख्या लँडिंग पेजचा LCN नंबर मिळवणाऱ्या चॅनल्सना मिळणार नाही.
  • अंतिम व्ह्यूअरशिपमधून लँडिंग पेज डेटा काढून ते एक समान स्पर्धेचे क्षेत्र बनवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
  • व्ह्यूअरशिप मोजण्यासाठी कालावधी २ मिनिटांपर्यंत वाढवावा कारण ते रिअल व्ह्यूअरशिप कॅप्चर करते, या ZMCL च्या दाव्यात तथ्य आहे.

फ्री डिशवरील प्रसारण बंद आणि ZMCLचा बार्कमधून लँडिंग पेज मुद्द्यावर माघार!

  • आजवर ZMCLने आपले ९ न्यूज चॅनल्स फ्री डिशवर प्रसारीत करत असे.
  • पण ते योग्य नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या.
  • गेली काही वर्षे होत असलेल्या तक्रारींची दखल घेत माहिती प्रसारण खात्याने ZMCLच्या चॅनल्सचे फ्री डिशवरील प्रसारण थांबवले.
  • त्यामुळे बार्क रेटिंगवर परिणाम होण्याची भीती असतानाच योगायोगाने ZMCLने लँडिंग पेजचा मुद्दा उपस्थित करत बार्कमधून माघार घेतल्याचे समोर आले आहे.

Tags: Free DishNews Channel BARC RatingZee mediaZMCLझी मीडियान्यूज चॅनल्स बार्क रेटिंगफ्रि डिशमाहिती आणि प्रसारण खाते
Previous Post

‘झी २४ तास’ फ्री डिशमागोमाग बार्क रेटिंगमध्येही नाही! झीच्या माघारीनंतर ५ चॅनल्समध्येच स्पर्धा, टीव्ही9मराठी नंबर१!

Next Post

“गोपाल रत्न पुरस्कार -२०२२” करिता अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
Sachindra Pratap Singh

“गोपाल रत्न पुरस्कार -२०२२” करिता अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!