मुक्तपीठ टीम
एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरु असताना आता उत्तर कोरियाने संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवले आहे. उत्तर कोरियाने प्रशांत महासागरातून जपानवरून क्षेपणास्त्र डागले. कोणताही इशारा न देता उत्तर कोरियाच्या या आक्रमक वृत्तीनंतर जपानमध्ये खळबळ उडाली असून जपानमध्ये धोक्याचा इशारा देणारे सायरन वाजले. सायरन वाजल्यानंतर जपानी नागरिकांनी भूमिगत ठिकाणी आसरा घेतला. तर, देशातील उत्तर भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. उत्तर कोरियाने मागील १० दिवसात पाचवे क्षेपणास्त्र डागले. जपानसह दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने पाणबुडीविरोधी सराव केला. त्यानंतर उत्तर कोरियाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे.
उत्तर कोरियाने केलेली ही सर्वात महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी !!
- उत्तर कोरियाने मंगळवारी (जपानी वेळ ४ ऑक्टोबर) पाच वर्षांत प्रथमच जपानवर मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागले.
- त्यामुळे जपानमध्ये खळबळ उडाली.
- प्रशासनाला लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगावे लागले.
- गाड्या थांबवण्यात आल्या.
- जपानने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबत केलेल्या लष्करी अभ्यासानंतर उत्तर कोरियाने विरोध करण्यासाठी अशा प्रकारच्या चाचण्या सुरू केल्याचे समजते.
- जानेवारीनंतर उत्तर कोरियाने केलेली ही सर्वात महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी होती.
- जानेवारीमध्ये त्यांनी गुआमच्या यूएस क्षेत्रापर्यंत पोहोचण्यास सक्षम असलेले ह्वासॉन्ग-12 मध्यवर्ती-श्रेणीचे क्षेपणास्त्र सोडले.
- यानंतर जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी यावर चर्चा करण्यासाठी सुरक्षा बैठक बोलावली होती.
जपानकडून या चाचणीचा निषेध!!
- उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर जपानने या चाचणीचा निषेध केला आहे.
- कीशिदा म्हणाले ही एक क्रूर कृती आहे.
- क्षेपणास्त्र डागल्या नंतर जपान पंतप्रधान कार्यालयाने उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून गेले असल्याचे ट्वीट केले.
- उत्तर कोरिया आणि जपान यांच्यातील संबध ताणले गेल्याने भविष्यात यावरून दोन्ही देशात आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
दहा दिवसांत पाचवी क्षेपणास्त्र चाचणी
- उत्तर कोरियाने १० दिवसांत ही पाचवी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली आहे.
- उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राचा शोध जपानी तटरक्षक दल आणि दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने लावला.
- यानंतर उत्तर जपानमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- ईशान्येकडील होक्काइडो आणि आओमोरी भागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.