मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वेने व्हॉट्सअॅपवरही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. आता एखाद्या प्रवाशाला त्याच्या ट्रेनचे लाइव्ह स्टेटस पाहण्यासाठी किंवा पीएनआर स्टेटस तपासण्यासाठी रेल्वेच्या कोणत्याही वेबसाइटवर जाण्याची गरज भासणार नाही. आयआरसीटीसीने व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे जिथे प्रवासी काही मिनिटांत सर्वकाही सहज तपासू शकतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Railofy WhatsApp चॅटबॉट क्रमांक +९१-९८८११९३३२२ सेव्ह करावा लागेल. या सुविधेमुळे रिअल-टाइम अलर्ट आणि ट्रेनचे तपशील आणि लाइव्ह अपडेट्स मिळतील.
आता घरी बसून व्हॉट्सअॅपवर ट्रेनशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळणार आहे. मुंबईस्थित स्टार्टअप रेलोफीने एक चॅटबॉट विकसित केला आहे जो भारतीय रेल्वे प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर पीएनआर स्टेटस आणि रिअल-टाइम स्टेटस तपासण्याची परवानगी देतो.
व्हॉट्सअॅपवर पीएनआर स्टेटस लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स
- स्मार्टफोनच्या कॉल लिस्टमध्ये Railofy चा ट्रेन चौकशी क्रमांक +९१-९८८११९३३२२ सेव्ह करा.
- व्हॉट्सअॅप उघडून सेव्ह केलेल्या Relofy च्या चॅटबॉट नंबरच्या चॅट विंडोवर जा.
- तुमच्या ट्रेनचा १० अंकी पीएनआर नंबर टाका.
- आता Railofy चॅटबॉट तुम्हाला पीएनआर स्टेटस, ट्रेन स्टेटस आणि अलर्ट यासारखे तपशील पाठवेल.
- चॅटबॉट तुम्हाला व्हॉट्सअॅपवर रिअल-टाइम ट्रेन स्टेटस पाठवेल.