मुक्तपीठ टीम
अखेर विरोधकांकडून टीका होत असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्री जाहीर केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे ते सुपरपालक मंत्री ठरले आहेत. तर दुसरीकडे राजकीय महत्वासाठी पाहिजे त्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने काही मंत्री नाराज झाल्याची चर्चा आहे.
आधी विरोधकांची टीका, आता मंत्र्यांची राजीनामा!
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली आहे.
- त्याअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले आहे.
- मंत्रिमंडळ विस्तारापासून पालकमंत्री पद वाटपाचे प्रकरण रखडले होते.
- विरोधकांकडूनही सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.
- शनिवारी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले.
- मात्र अपेक्षित जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने काही मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.
नाराजीची चर्चा..
- काही मंत्र्यांकडे दोन ते तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
- मात्र, अपेक्षित जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्री नाराज आहेत.
- शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांची मुंबई शहर आणि कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- तर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना करण्यात आले आहे.
- यासोबतच फडणवीस यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली, अकोला, भंडारा या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.