Wednesday, September 30, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या विचार नसावेत म्हणजे झालं, गुलाबराव पाटलांचा टोमणा!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shinde group MLA Gulabrao Patil

मुक्तपीठ टीम

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली स्थापन केलेली शिवसेना त्यांची स्थापना झाल्यापासून दसरा मेळावा घेत आहे. पण विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडानंतर शिवसेनेचा दसरा मेळावाही धोक्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तरीही शिंदे गटाचा विरोध मावळलेला नाही. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला मारला आहे, ते म्हणाले की, “ठाकरे सरकारने सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार दसरा मेळाव्यात मांडू नयेत.”

दसरा मेळाव्यावरून गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोमणा!

  • दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
  • शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळ्यात सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे विचार उद्धव ठाकरे ठेवणार नाहीत, एवढीच अपेक्षा असल्याचे पाटील म्हणाले.
  • दरम्यान, आम्ही सर्व बीकेसीमध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या शिवाजी पार्कवर उद्धव सरकारला दसरा मेळावा घेण्याच्या निर्णयावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, असे ते म्हणाले. दसरा सभेला जास्तीत जास्त गर्दी जमवण्याचा प्रयत्न आता शिंदे गट करणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी शिंदे गटाच्या सर्व नेत्यांनी तयारी सुरू केल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिली

  • शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयाने मेळाव्याला परवानगी दिली असेल पण काही गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या आहेत.
  • कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची विशेष काळजी घ्यावी, असे न्यायालयाने बजावले आहे

Tags: Bombay High CourtChief Minister Eknath ShindeDussehra gatheringmuktpeethShinde group MLA Gulabrao Patilshiv senaUddhav Thackerayउद्धव ठाकरेघडलं-बिघडलंदसरा मेळावामुक्तपीठमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबई उच्च न्यायालयशिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटीलशिवसेना
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी साधलेला संवाद

Next Post

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा नाराजी, पाहिजे त्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने मंत्री नाराज!

Next Post
Eknath Shinde

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा नाराजी, पाहिजे त्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने मंत्री नाराज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!