मुक्तपीठ टीम
डीव्हीईटी म्हणजेच व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात आर्ट डायरेक्टर ग्रुप सी आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ग्रुप सी या पदांवर एकूण १ हजार ४५७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा १०वी उत्तीर्ण + आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ८२५ रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी डीव्हीईटीच्या अधिकृत वेबसाइट https://www.dvet.gov.in/mr/ वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1IFWn9O3RzgSiDj0fUvz-vmj58lAPpeYf/view
अर्ज करण्यासाठी नोकरीची लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/78392/Registration.html