मुक्तपीठ टीम
आपल्या विनोदाने खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आता राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने काम करणं बंद केल्याची माहिती समोर आली आहे. राजू श्रीवास्तव ब्रेन डेड झाल्याRची माहिती आहे. सोशल मीडियावर तर त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवली जात आहे, मात्र त्यांची मृत्यूशी झुंज सुरुच आहे. दरम्यान, ब्रेन डेड म्हणजे काय असतं हे जाणून घेऊ…
राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी ते व्हेंटिलेटरवर असल्याची पुष्टी केली आहे. त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांनी कोणत्याही प्रकरच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. राजू श्रीवास्तव यांचा मेंदू जवळपास मृत झाला आहे. त्याचं हृदयही नीट काम करत नाही. राजू श्रीवास्तव यांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र आणि नातेवाईक रुग्णालयात पोहोचले आहेत. ही बातमी कळल्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की ब्रेन डेड म्हणजे काय? आपल्या मेंदूमध्ये असे काय होते की त्याला मृत घोषित केले जाते?
ब्रेन डेड म्हणजे काय?
- ब्रेन डेड अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेंदू प्रतिसाद देणे थांबवतो.
- एखाद्या व्यक्तीचा ब्रेन डेड झाल्यानंतरही त्याचे हृदय धडधडत राहते परंतु मेंदूच्या त्या भागाद्वारे होणार्या क्रिया शरीर करणे थांबवते.
- या स्थितीत शरीराची हालचाल, डोळ्यांच्या बाहुल्यांचा प्रतिसाद यावर परिणाम होतो.
- ब्रेन डेड रुग्णांचा मेंदू कार्य करणं थांबतो पण त्यांचं हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत असे अवयव काम करत असतात.
- तुम्हाला ब्रेन डेड व्यक्ती झोपलेली दिसेल.
- रुग्ण स्वतःहून श्वासोच्छवास करू शकत नाही.
- अशा स्थितीत, रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते जेणेकरून त्याचा श्वासोच्छ्वास चालू राहील.
- ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या हालचालीही नसतात.
- जर ब्रेन डेड घोषित केले तर त्याचा अर्थ कायदेशीररित्या मृत आहे.
- ब्रेन डेडच्या तारखेलाच त्याचे मृत्यू प्रमाणपत्र दिले जाईल. पुढचे काही दिवस त्याचा श्वासोच्छ्वास सुरू राहिला तरीही तीच तारीख मानली जाते.
- ब्रेन डेडमध्ये काही रुग्ण फक्त काही तास जगू शकतात, तर काही रुग्ण बरेच दिवस जगू शकतात.