मुक्तपीठ टीम
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा चाचा-भतिजा म्हणजेच काका-पुतण्यांच्या जोडी फॉर्मात आहे. नितिश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नव्या नात्यानं काका-पुतण्यांची जोडी सत्तेवर आली. त्यामुळे आता भाजपाच्या राजकारणात फुटलेली खऱ्या काका-पुतण्यांची जोडी मात्र दुरावलेली जोडीही एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. या जोडीला फोडण्याचा आरोप झालेली भाजपाच नितीशकुमार-तेजस्वी या काका-पुतण्यांच्या जोडीला टक्कर देण्यासाठी आपल्या जुन्या मित्रपक्षाच्चा दोन्ही गटांना एकत्र आणण्याची शक्यता आहे. सर्वांच्या नजरा पारस पासवान आणि चिराग पासवानवर आहेत. पशुपती पारस यांनी जाहीरपणे एनडीएसोबत राहण्याची घोषणा केली आहे. मात्र, चिराग यांनी अद्याप काहीचं यावर भाष्य केलेले नाहीत. त्यांच्या या भूमिकेचा २०२४ च्या लोकसभा निवडणुका तसेच २०२५ च्या विधानसभा निवडणुकांवर परिणाम होईल.
चिराग पासवान सध्या स्वतंत्र भूमिकेत, तर काका भाजपासोबत!
- चिराग पासवान हे नितीशकुमार यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
- स्वत:ला पंतप्रधान मोदींचे हनुमान म्हणवणाऱ्या चिराग पासवान यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या त्यांच्या काकाला भाजपानेच बळ दिले.
- त्यामुळे रामविलास पासवानांच्या पश्चात त्यांचा लोक जनशक्ती पक्ष फुटला, त्यांची निशाणीही गोठवली गेली.
- त्याचा फटका पारसनाथ आणि चिराग अशा दोघांनाही बसला.
- त्यामुळे अखर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.
- त्याचवेळी २०२४ च्या निवडणुकीत पशुपती पारस आणि चिराग यांनी नितीश कुमार यांच्या विरोधात आघाडी उघडल्यास त्यांच्यासोबत एनडीएला फायदा होईल.
पारस यांच्या पक्षात फूट पडण्याची शक्यता!!
- लोजपामधील फुटीबाबत शनिवारी दिवसभर सट्टेबाजार सुरू होता.
- बदललेल्या परिस्थितीत पक्षाचे तीन खासदार खगरियाचे चौधरी मेहबूब अली कैसर, नवादाचे चंदन सिंह आणि वैशालीच्या वीणा सिंह कधीही जेडीयूमध्ये प्रवेश करू शकतात.
- मात्र, आरएलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष पशुपती कुमार पारस, पक्षाचे ज्येष्ठ नेते सूरज भान सिंग यांनी ही बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे.
- पण आपला पक्ष फुटण्याच्या भातीतूनही हे दोन नेते एकतेचा मंत्र जपू शकतील.
यामुळे काका-पुतण्या एकत्र येऊ शकतात!
- दोन्ही पक्षांचे मूळ विचार आणि दृष्टिकोन एकच असल्याने काका-पुतण्या एकत्र होण्याची शक्यता जास्त आहे.
- दोघेही रामविलास पासवान यांचा आदर्श मानत राजकारणात पुढे चालण्याच्या बाजूने आहेत.
- एकत्र लढले तर त्यांना त्यांची ठरलेली मते मिळवता येतील.
- वादानंतर मूळ लोजपचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे गोठवण्यात आले आहे.
- अशा स्थितीत एकजूट झाल्यानंतर त्यांना पक्षाचे जुने नाव आणि निवडणूक चिन्ह परत मिळण्याची शक्यता आहे.