मुक्तपीठ टीम
देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारीवरून काँग्रेसने शुक्रवारी देशभर आंदोलन केले. काँग्रेसने निषेध म्हणून काळे कपडे घालत शुक्रवारचा दिवस यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिवशी राम मंदिराची पायाभरणी केली होती. त्यामुळे काँग्रेसने आज काळ्या कपड्यात आंदोलन करून आम्ही रामजन्मभूमीला विरोध करत असल्याचे दाखवून दिले, असे अमित शाह यांनी सांगितले.
काय म्हणाले अमित शाहा?
- गृहमंत्री अमित शाहा म्हणाले की, काँग्रेसने या दिवशी काळे कपडे घालून निषेध केला, तर याच दिवशी पंतप्रधान मोदींनी रामजन्मभूमीची पायाभरणी केली होती.
- ते म्हणाले की, काँग्रेसला आज निदर्शने करून संदेश द्यायचा आहे की, रामजन्मभूमीच्या पायाभरणीला त्यांचा विरोध आहे आणि तुष्टीकरणाचे धोरण पुढे चालवायचे आहे.
- एक जबाबदार पक्ष असल्याने काँग्रेसने कायद्याला सहकार्य करावे, असे अमित शाहा म्हणाले.
- काँग्रेसने ईडीच्या तपासात सहकार्य करावे. तक्रारीच्या आधारे प्रकरण सुरू आहे.
- देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे, असे अमित शाह म्हणाले.
काँग्रेसचे काळे कपडे घालून आंदोलन!!
- महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसच्या निदर्शनात सहभागी नेत्यांनी घोषणाबाजी, मोर्चे, धरणे आणि बॅनरद्वारे निषेधच केला.
- यावेळी काळे कपडे घालूनही त्यांनी आपला प्रतिकार व्यक्त केला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काळा कुर्ता घातला होता.
- लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी काळी पँट आणि शर्ट परिधान केले होते.
- त्याचवेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते पी चिदंबरम आणि दीपेंद्र सिंग हुड्डा यांनी काळे शर्ट तसेच काळ्या टोप्या परिधान केल्या होत्या.
- पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्यासह काही नेत्यांनी पांढरे कपडे परिधान केले असले तरी त्यांनी हातावर काळी पट्टी बांधून निषेध केला.