मुक्तपीठ टीम
टाटा मोटर्सने आपली नवीन टाटा सफारी भारतात लाँच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही प्रचंड चर्चेत होती. तसेच या एसयूव्हीची भारतीय बाजारपेठेतील किंमत १४.६९ लाख रुपये इतकी निश्चित केली असून या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिअंटची किंमत २१.४५ लाख रुपयांपर्यंत आहे. कंपनीकडून सफारीची प्री बुकिंग आधीच सुरु करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहक कंपनीच्या अधिकृत डीलरशिपवर ३० हजार रुपये टोकन देऊन बुक करु शकतात.
फीचर्स
- टाटा मोटर्सने आपली आयकॉनिक एसयूव्ही सफारी तब्बल ६ व्हेरिअंटमध्ये लाँच केली आहे. यात एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सटी+, एक्सझेड आणि एक्सझेड+ यांचा समावेश आहे.
- याचसोबत कंपनीने ६ सीटर आणि ७ सीटर कॉन्फिगरेशन मॉडेल बाजारात आणले आहे.
- कंपनीने लाँच केलेल्या सर्व व्हेरिअंटमध्ये ७ सीटर कॉन्फिगरेशन उपलब्ध आहे.
- परंतु ६ सीटर कॉन्फिगरेशन केवळ एक्सझेड+ आणि एक्सझेडए+ व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल.
- नवीन सफारी डायटोना ग्रे, रॉयल ब्लू आणि ऑर्कस व्हाइट अशा तीन रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आली आहे.
पॉवर परफॉरमन्सबद्दल
- पॉवरसाठी बीएस ६ कम्पलायंस असलेले २.० लीटरचे ४ सिलेंडरचा क्रायोटेक टयुर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे.
- हे इंजिन १७० BHP पॉवर आणि ३५० Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स असेल.
लूकबद्दल
- नवीन सफारीमध्ये १८-इंचाचे अॅलॉय व्हील्स आहेत, याशिवाय Tata Harrier च्या तुलनेत नवीन सफारी ६३ मिलीमीटर लांब आणि जवळपास ८० मिलीमीटर उंच आहे.
- सफारीचा फ्रंट लूक री-डिझाइन करण्यात आले असून यात क्रोम एलिमेंट्सही दिले आहेत.
- सफारीच्या मागील बाजूलाही नवीन एलईडी टेललॅम्पसोबत री-डिझाइन लूक पाहायला मिळेल.