मुक्तपीठ टीम
अॅपबेस कॅब सेवा आता सर्वांनाच उपयोगी पडते. आपण सर्वांनी कधी ना कधी ऊबेर कॅब सेवा वापरली असेल. तशी खूप उपयोगी असणारी ही सेवा काही वेळा तापदायकही ठरते. अॅपवर बुक केल्यानंतर त्या ठरलेल्या वेळेवर येतातच असे नाही, तर कधी लोकेशन विचारून राईड रद्द केली जातात. राईड रद्द झाल्यामुळे वेळ आणि मूड दोन्ही खराब होतात. तुम्हालाही जर अशा समस्येचा सामना करावा लागला असेल, तर ऊबेरचं हे अपडेट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
ऊबेरच्या नवीन अपडेटमध्ये मिळणार या सुविधा…
- ऊबेरने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवीन अपडेटची घोषणा केली आहे.
- यात ऊबेर ड्रायव्हर्स राइड विनंती स्वीकारण्यापूर्वी प्रवासाचे ठिकाण पाहू शकतील.
- प्रवासी आणि चालक या दोघांच्याही सोयी लक्षात घेऊन कंपनी हे फीचर आणणार आहे.
- हे फीचर सुरू केल्यामुळे, ड्रायव्हर्सना तुमची राइड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वीच डेस्टिनेशन शोधता येणार आहे.
- कंपनीने हे फीचर मे २०२२ मध्ये पायलट अपडेट म्हणून लाँच केले होते.
- तेव्हापासून, राइड रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
- कंपनीने ट्रिप स्वीकृती थ्रेशोल्ड काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
- कंपनीने कोणत्याही अटीशिवाय हे फीचर संपूर्ण भारतात सुरू केले आहे.
उबरची चालकांना मदत…
- इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेता कंपनीने चालकांच्या पेमेंटमध्ये १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या चालकांना कंपनीने नुकसान भरपाई देण्यास सुरुवात केली आहे.
- कंपनीने प्लॅटफॉर्मवर आणखी एक अपडेट आणण्याचे स्पष्ट केले आहे.
- हे अपडेट आल्यानंतर, ड्रायव्हरला पेमेंटची पद्धत आधीच कळेल.
- म्हणजे आता प्रवाशी रोख पैसे भरणार आहे की ऑनलाइन हे चालकांना आधीच कळणार आहे.
दिल्ली, मुंबईसह अनेक विमानतळावर केले कॅशलेस ऑपरेशन सुरू
- एअरपोर्टला जाणाऱ्या प्रवाशांना वेटिंगची माहिती नसते.
- अशा वेळी कॅब ड्रायव्हरला विमानतळावर बराच वेळ थांबाव लागतं.
- अशा परिस्थितीत कॅब ड्रायव्हरच्या स्मार्टफोनवर पुश नोटिफिकेशन पाठवले जाईल.
- काहीवेळा वाहनचालकांना विमानतळावर आगाऊ शुल्क भरावे लागते.
- उबरने दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बंगळुरूच्या विमानतळांवर कॅशलेस ऑपरेशन सुरू केले आहे.